शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांद्याची काय स्थिती?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशी आणि तुरीच्या दरात वाढ नोंदवली गेली असताना, कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र, सोयाबीनच्या बाजारभावात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अमरावती : 29 जानेवारी रोज गुरुवारी राज्यातील कृषी बाजारांमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र पाहायला मिळालं आहे. कपाशी आणि तुरीच्या दरात वाढ नोंदवली गेली असताना, कांद्याचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र, सोयाबीनच्या बाजारभावात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील आजच्या आवक आणि दरांचा सविस्तर आढावा जाणून घ्या.
कपाशीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 14 हजार 522 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. 3 हजार 252 क्विंटल सर्वाधिक आवक अकोला बाजारात झाली. त्याठिकाणी कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बुलढाणा बाजारात आलेल्या कपाशीला 8 हजार 395 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या बाजारभावांच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
advertisement
कांद्याचे दर स्थिर
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण 1 लाख 83 हजार 466 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 76 हजार 922 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 325 ते कमाल 1 हजार 425 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात आवक झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 560 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. बुधवारी मिळालेला उच्चांकी दर आज स्थिर आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात घट
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 8 हजार 063 क्विंटल इतकी नोंदवण्यात आली. लातूर बाजारात 2 हजार 769 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 5 हजार 539 तर जास्तीत जास्त 5 हजार 881 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. नाशिक बाजारात आवक झालेल्या सोयाबीनला 5 हजार 961 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या बाजारभावात घट नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तुरीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 10 हजार 029 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जळगाव बाजारात 2 हजार 626 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक झाली. येथे तुरीला किमान 7 हजार 400 ते कमाल 8 हजार 376 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात आवक झालेल्या तुरीला 9 हजार 300 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 9:13 PM IST









