तुरीच्या दरात मोठी वाढ, सोयाबीनचे भाव पुन्हा घसरले, कापसाची काय स्थिती? Video

Last Updated:

1 जानेवारी गुरुवार रोजी राज्याच्या कृषी बाजारात विविध शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कपाशी, कांदा आणि सोयाबीनच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असून, तुरीच्या दरात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. 

+
News18

News18

अमरावती : 1 जानेवारी गुरुवार रोजी राज्याच्या कृषी बाजारात विविध शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कपाशी, कांदा आणि सोयाबीनच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असून, तुरीच्या दरात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आवक देखील घटलेली दिसून येत आहे. राज्यातील कृषी बाजारात प्रमुख शेतमालांची आवक किती झाली? भाव किती मिळाला? पाहुयात.
कपाशीच्या दरात घट
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.15 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 19 हजार 160 क्विंटल कपाशीची आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 4 हजार 344 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. वर्धा बाजारात कपाशीला 7469 ते 8010 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या बाजारांत कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला आहे. मात्र, बुधवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित घट झाल्याचं दिसत आहे.
advertisement
कांद्याच्या दरातही घसरण
आज राज्यातील कृषी बाजारात 1 लाख 71 हजार 368 क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 85 हजार 937 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. कांद्याला 571 ते 2063 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याला 250 ते 2750 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. मात्र, बुधवारी मिळालेल्या उच्च दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट पाहायला मिळाली.
advertisement
सोयाबीनचे दर पुन्हा घसरले
आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 27 हजार 599 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये जालना बाजारात 5 हजार 387 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. सोयाबीनला 3200 ते 5100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 5505 रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला. बुधवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरातही घट झाल्याचं दिसून येत आहे.
advertisement
तुरीच्या दरात मोठी वाढ
आज राज्यातील कृषी बाजारात एकूण 9 हजार 484 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना बाजारात 3 हजार 572 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक नोंदवण्यात आली. पांढऱ्या तुरीला 5400 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात आलेल्या 2 क्विंटल काळ्या तुरीला 8550 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला आहे. बुधवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुरीच्या दरात मोठी वाढ, सोयाबीनचे भाव पुन्हा घसरले, कापसाची काय स्थिती? Video
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement