Health Drink : नव्या वर्षात आरोग्याची घ्या चांगली काळजी, हेल्थ ड्रिंकनं करा दिवसाची सुरुवात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अनेकदा वातावरण, काहीवेळा कमी झोप, ताण, रक्तातील साखर, अन्न, अल्कोहोल आणि कधीही पूर्णपणे शांत न होणारी मज्जासंस्था, प्रतिकारशक्ती अशा विविध कारणांमुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, दिनचर्येत काही आरोग्यदायी पेयं असणं फायदेशीर आहे. जाणून घेऊया काही पर्याय.
मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात काही ठिकाणी पावसानं झाली, काही भागात धुक्यानं झाली. या थंडगार हवेत आरोग्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, हिवाळ्यात काही भागत खाण्याच्या सवयींपासून ते जीवनशैलीतही बदल होतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
अनेकदा वातावरण, काहीवेळा कमी झोप, ताण, रक्तातील साखर, अन्न, अल्कोहोल आणि कधीही पूर्णपणे शांत न होणारी मज्जासंस्था, प्रतिकारशक्ती अशा विविध कारणांमुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, दिनचर्येत काही आरोग्यदायी पेयं असणं फायदेशीर आहे. जाणून घेऊया काही पर्याय.
advertisement
आलं लिंबू पाणी - आलं आणि लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आलं आणि लिंबू या मिश्रणामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते यामुळे पचनसंस्था मजबूत राहते.
हळद आणि दूध - हळद आणि दूध, ज्याला गोल्डन मिल्क असंही म्हणतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो आणि त्वचेचा रंग सुधारतो. यामुळे चांगली झोप लागते, शरीराचं संसर्गापासून रक्षण होतं आणि सूज कमी होते.
advertisement
बडीशेप पाणी - बडीशेप पाणी हा एक हर्बल पर्याय आहे. बडीशेप पाण्यात उकळून हे पेय बनवलं जातं. अडीचशे मिली कोमट पाण्यात आणि एक चमचा बडीशेपेची पूड घाला. या पाण्यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं आणि पचन सुधारतं.
दालचिनी पाणी - पचन सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचं पाणी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, आम्लता, कोलेस्ट्रॉल आणि सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो.
advertisement
ग्रीन टी - ग्रीन टीमुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. यामुळे ताण कमी होतो, चयापचय वाढतं, पचनसंस्था मजबूत होते आणि यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं आणि रोगांशी लढण्यासाठी शरीराला मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 8:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Drink : नव्या वर्षात आरोग्याची घ्या चांगली काळजी, हेल्थ ड्रिंकनं करा दिवसाची सुरुवात