रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई, बीडचा शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
beed farmer success story - हा व्यवसाय करण्याआधी ते ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन या पिकांपासून उत्पन्न मिळवायचे. परंतु त्यांना काही दिवसानंतर शेतीला जोड व्यवसाय काहीतरी करायला पाहिजे, याची कल्पना सुचली. कालांतराने त्यांना नवनवीन प्रयोग करणाऱ्या लोकांशी ओळखी वाढू लागल्या आणि त्यांना रेशीम शेती या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड - दिवसेंदिवस रेशीम शेतीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. खऱ्या अर्थाने हा व्यवसाय अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा ठरला आहे. अनेकांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलेल आहे. कारण कमीत कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न कसे मिळवायचं हे आपण या व्यवसायाच्या माध्यमातून शिकू शकतो. सुरुवातीला काही प्रमाणात खर्च लागेल. मात्र, एकदा झालेली सुरुवात ही पुढील 4 ते 5 वर्षांसाठी आपल्याला हवी तशी आपण याच्यामध्ये नवनवीन पद्धतीने बदल करू शकतो. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
बळीराम डाके असे बीड येथील एका शेतकऱ्याचे नाव आहे. बळीराम डाके यांनी या व्यवसायाला सुरुवात करत असताना शेतीसह जोड व्यवसाय म्हणून सुरुवात केली होती. हा व्यवसाय करण्याआधी ते ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन या पिकांपासून उत्पन्न मिळवायचे. परंतु त्यांना काही दिवसानंतर शेतीला जोड व्यवसाय काहीतरी करायला पाहिजे, याची कल्पना सुचली. कालांतराने त्यांना नवनवीन प्रयोग करणाऱ्या लोकांशी ओळखी वाढू लागल्या आणि त्यांना रेशीम शेती या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली.
advertisement
पारंपारिक पद्धतीने पीक घेण्यापेक्षा काहीतरी वेगळे केले तर त्या माध्यमातून वेगळी कमाई होऊ शकते, असा रेशीम लागवडीमागचा त्यांचा उद्देश होता आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले हे प्रयत्न यशस्वी ठरले. मागील 2 ते 3 वर्षांपासून बळीराम डाके हे रेशीम शेतीचे पीक घेतात. या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या चांगली मदत देखील मिळते.
वर्षभरात 1 लाख लोकं देतात भेट, पुण्यात आहे 70 वर्ष जुनं मत्स्यालय, इतक्या प्रकारचे मासे दुसरीकडे कुठेही पाहिले नसतील, VIDEO
शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करता यावा, यासाठी बळीराम डाके हे नेहमी प्रयत्नशील असतात. अगदी याच गोष्टींचा विचार करत त्यांनी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेतीची निवड केली. बळीराम डाके यांच्या रेशीम शेतीत प्रत्येक 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत रेशीमची एक बॅच तयार होते आणि त्यांना प्रत्येक बॅचमध्ये एक ते दीड लाख एवढी कमाई होते. अशाप्रकारे ते रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
Location :
Bidar,Karnataka
First Published :
September 20, 2024 4:36 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई, बीडचा शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?, VIDEO