Ration Card eKYC : कुठेही जाण्याची गरज नाही! रेशन कार्डचे घरबसल्या मोबाईलद्वारे करा eKYC,वाचा संपूर्ण प्रोसेस

Last Updated:

Ration Card eKYC : रेशनकार्डबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.पण आम्ही तुम्हाला रेशन कार्डच्या ई-केवायसीबद्दल माहिती देणार आहोत.त्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून ई-केवायसी कसे करू शकता हे समजून घेणे तुमच्यासाठी सोपे होईल. तसेच, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

News18
News18
मुंबई : रेशनकार्डबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.पण आम्ही तुम्हाला रेशन कार्डच्या ई-केवायसीबद्दल माहिती देणार आहोत.त्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून ई-केवायसी कसे करू शकता हे समजून घेणे तुमच्यासाठी सोपे होईल. तसेच, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याची आम्ही तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेसह सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत
मोबाईलवरून रेशन कार्ड ई-केवायसी कसं करायचे?
सर्वप्रथम तुम्हाला फूड अँड लॉजिस्टिकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
साइट उघडल्यानंतर, तुम्हाला रेशन कार्ड केवायसी ऑनलाइन हा पर्याय शोधावा लागेल.
यानंतर तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे टाकावी लागतील.
येथे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक देखील टाकावा लागेल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड भरावा लागेल.
advertisement
आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू होईल.
ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला बायोमेट्रिकसाठी अर्ज करावा लागेल.
कुटुंबातील सर्व सदस्यांचे बायोमेट्रिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस बटणावर क्लिक करावे लागेल.
सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर, कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी केले जाईल.
ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
जर तुम्हीही ई-केवायसी करणार असाल तर सर्वप्रथम तुमच्याकडे रेशन कार्ड असले पाहिजे. त्याच्या मदतीनेच तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल. रेशन कार्डधारक भारतीय वंशाचा असावा.तुम्ही मुख्य कागदपत्र म्हणून आधार कार्ड वापरू शकता. त्याच्या मदतीने, संपूर्ण केवायसी करता येते जे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Ration Card eKYC : कुठेही जाण्याची गरज नाही! रेशन कार्डचे घरबसल्या मोबाईलद्वारे करा eKYC,वाचा संपूर्ण प्रोसेस
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement