Weather Alert: बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाचा बँडबाजा, कोकणात मुसळधार, मुंबईला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांच्या निरोपाला वरुणराजा जोरदार हजेरी लावणार आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज अनंत चतुर्दशीनिमित्ताने संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीमय माहोल यामुळे रस्ते गजबजलेले आहेत. पण याचसोबत हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे उत्सवात पावसाचीही साथ मिळणार असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
advertisement
advertisement
advertisement
गेली आठवडाभर पालघर मध्ये जोरदार पाऊस पडतोय आजही पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. हवामान विभागाने इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 24 अंश राहील. मध्यम ते जोरदार वारे वाहणार आहेत.
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार असेल, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडेल. या भागात किमान तापमान 24 अंश आणि कमाल 30 अंश राहील. आर्द्रता 89% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग सरासरी 30 किमी प्रतितास असेल. समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळण्याचा अंदाज असल्याने विसर्जन मिरवणुकीदरम्यान विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.