advertisement

Weather Alert: अनंत चतुर्दशीला वारं फिरलं, मराठवाड्यातून मोठं अपडेट, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी हवामान आणि पावसाच्या स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहिला. आता मात्र हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने एकाही जिल्ह्याला 'सतर्कतेचा अलर्ट' दिलेला नाही. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हवामानात थंडता निर्माण होऊ शकते आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.

4/5
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज ढगाळ आणि दमट वातावरण राहील. तसेच ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

5/5
मराठवाड्यात पुढील काही काळ हलक्या ते मध्यम पावसाची स्थिती कायम राहणार आहे. तसेच ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचे प्रमाण देखील कमी होणार आहे. हवामानाच्या बदलामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपल्या शेती कामाचे नियोजन करावे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement