ऐन सणासुदीत 'नारळा'चे दर कडाडले, दिवाळीपर्यंत दर आणखी वाढणार, व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : सण-उत्सव जवळ आले की, प्रत्येक घरात नारळाची मागणी वाढते. मात्र, यंदा नारळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात...
Sangali News : सण-उत्सव जवळ आले की, प्रत्येक घरात नारळाची मागणी वाढते. मात्र, यंदा नारळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात मोठ्या नारळाचा दर 50 रुपयांपर्यंत पोहोचला असून, लहान नारळही 35 रुपयांना मिळत आहे. या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.
नारळाच्या दरात तेजी का?
श्रावण महिन्यापासून सण, समारंभ आणि लग्नसराईमुळे नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून नारळाची मागणी सातत्याने वाढत आहे. यंदा ती गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, असे नारळाचे घाऊक व्यापारी सांगतात. नारळाचे प्रमुख उत्पादन कर्नाटकातील कित्तूर आणि तामिळनाडूतील कांगायम येथे होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे आणि सततच्या पावसामुळे नारळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाही. याचा थेट परिणाम दरावर झाला आहे.
advertisement
उत्सव आणि दर वाढ
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात, रक्षाबंधनासाठी गुजरातमध्ये, तर दसरा-दिवाळीत इतर राज्यांमध्ये नारळाला मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. नारळाच्या दरात वाढ झाल्याने खोबरे आणि खोबरेल तेलाचे दरही वाढले आहेत. दिवाळीपर्यंत हे दर असेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नारळ हे असे एकमेव फळ आहे ज्याची मागणी वर्षभर असते आणि दरात कितीही चढ-उतार आले तरी ते विकले जाते. त्यामुळे, महागाई वाढली असली तरी नारळाची मागणी कमी होणार नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऐन सणासुदीत 'नारळा'चे दर कडाडले, दिवाळीपर्यंत दर आणखी वाढणार, व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण