advertisement

Crab Farming: नोकरीचा नाद सोडला, इंजिनिअर तरुणानं लावलं डोकं, खेकडा शेतीतून लाखोंची कमाई, काय केलं? Video

Last Updated:

Crab Farming: सांगलीच्या इंजिनिअर तरुणाने पारंपारिक शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून खेकडा शेतीकडे लक्ष वेधले आहे. वन टाइम इन्वेस्ट्मेंट मधून वर्षाला लाखोंचा नफा देणाऱ्या या जोडधंद्याबाबत जाणून घेऊ.

+
Crab

Crab Farming: नोकरीचा नाद सोडला, खेकडा शेतीत लावलं डोकं, एकरात सहा लाखांची कमाई, काय केलं? Video

सांगली: अलिकडे अनेक तरुण शेतीसह शेतीपूरक व्यवसायांकडे वळताना दिसतात. सांगलीच्या इंजिनिअर तरुणाने पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून खेकडा शेतीकडे लक्ष वेधले आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंटमधून मयूर जगदाळे हे वर्षाला लाखोंचा नफा देणारी खेकडा शेती करत आहेत. हा खेकडा शेतीचा प्रयोग कसा आहे? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि बड्या पॅकेजची नोकरी होती. परंतु गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द बाळगून उच्चशिक्षित तरुणाने खेकडा शेतीतून उत्पादनाची वेगळी वाट पकडली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी गावच्या मयूर जगदाळे यांनी खेकडा उत्पादनाची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून नव्या प्रयोगाकडे लक्ष वेधले आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये गावी राहायला आलेले मयूर शेतामध्ये रमले. सुरुवातीपासूनच शेतीची आणि नवनवीन प्रयोग करण्याची आवड असल्याने लॉकडाऊनचा फायदा घेत त्यांनी घरच्या शेतीमध्ये प्रयोगशीलता जोपासण्याचे ठरवले. सुरुवातीला ऑनलाइन नोकरी करत मयूर यांनी शेतामध्ये करता येतील अशा नवनवीन बाबींचा अभ्यास केला. यातून त्यांनी पर्ल फार्मिंगचा प्रयोग देखील यशस्वी केला. यानंतर मार्केटमध्ये असलेल्या खेकड्यांच्या मागणीने त्यांचे लक्ष वेधले. यातून त्यांनी खेकडा उत्पादनासाठी अभ्यास केला. त्यातून अनेक गोष्टी आत्मसात करत ते गेल्या चार वर्षांपासून क्रॅब फार्मिंग करत आहेत.
advertisement
मार्केटचा अभ्यास
खेकडा पालनाबद्दल अधिक माहिती देताना मयूर यांनी सांगितले की, मार्केटमध्ये खेकड्यांना बारा महिने मागणी असते. परंतु खेकडे उत्पादनाचा काळ हा केवळ पावसाळ्यामध्येच असतो. पावसाळ्याच्या काळात अनेक ठिकाणी खेकडे सहज मिळतात. परंतु, पावसाळा वगळता आठ-नऊ महिने मार्केटमध्ये खेकड्यांचा तुटवडा दिसतो. मांसाहारी जेवणामध्ये खेकड्याला विशेष पसंती असल्याने हॉटेल लाईन हे खेकड्याचे मोठे मार्केट आहे. याशिवाय लोकल बाजारांमध्ये देखील खेकड्यांना नेहमी मागणी असते. याशिवाय फार्मास्युटिकल कंपन्या आणि क्रॅब ऑईल उत्पादित उद्योगांमध्येही खेकड्यांना कायम मागणी राहते. परंतु, दुर्दैवाने आपल्याकडे खेकडे पालनाविषयी योग्य मार्गदर्शन नसल्याने खेकडा उत्पादकांची संख्या मर्यादित आहे.
advertisement
गोड्या पाण्यातील खेकडा पालन
भारतामध्ये तामिळनाडू येथे राजीव गांधी ॲक्वाकल्चर सेंटर येथे क्रॅब फार्मिंगचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु तेथील प्रशिक्षण हे खाऱ्या पाण्यातील खेकडा पालनाविषयी आहे. त्या प्रशिक्षणाचा आधार घेत स्वतः इतर ठिकाणी निरीक्षण आणि अभ्यास करून मयूर यांनी गोड्या पाण्यातील खेकडा पालनाचा आराखडा तयार केला आहे. सुरुवातीला त्यांनी राहत्या घराशेजारी एक गुंठा क्षेत्रामध्ये गोड्या पाण्यातील खेकडा पालनासाठी कृत्रिम परंतु नैसर्गिक वाटेल असे तळे उभारले आहे.
advertisement
तीन प्रकारचे आराखडे
गोड्या पाण्यातील खेकडे पालनाचा नवीन प्रयोग यशस्वी करण्यासाठी मयूर यांनी बराच अभ्यास आणि संशोधन केले. यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आराखड्यांची माहिती मिळाली. यामध्ये त्यांनी तीन प्रकारचे आराखडे वापरले आहेत. प्रथम तयार केलेले नैसर्गिक तळे ज्याला त्यांनी भक्कम बांधकाम, दगड, माती, चिखल, पाण्यातील वनस्पती अशी रचना करून तळ्याचे किंवा ओढ्याचे स्वरूप तयार केले आहे. तसेच त्यांनी बॉक्स क्रॅब फार्मिंगचा सेट यासह पाईप क्रॅब फार्मिंगचा तिसरा सेट तयार केला आहे.
advertisement
वन टाइम इन्व्हेस्टमेंट
एक गुंठा क्षेत्रातील खेकडा पालनाचे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी मयूर यांनी सुरुवातीला अडीच ते तीन लाख रुपये गुंतवणूक केली. यामध्ये त्यांनी वडिलोपार्जित जागेमध्ये भक्कम चौकोनी तळे बांधले आहे. बांधीव तळ्यास चारी बाजूंनी तारांचे कंपाउंड केले आहे. तळ्यामध्ये दगड, माती, चिखल, काही वनस्पती अशा नैसर्गिक रचनेसह पाण्याची व्यवस्था आहे. तसेच बाजूंच्या भिंतीवर स्टाइल्स बसवल्या आहेत. यामुळे खेकडे कंपाऊंडच्या बाहेर येऊ शकत नाहीत. तळ्यातून वर आलेले खेकडे स्टाईलवरून घसरून परत तळ्यात जातात. यामध्ये खेकडे आणून सोडल्यानंतर तिथून पुढे पाणी व्यवस्थापन आणि खेकड्यांचा आहार यावरती मेहनत घ्यावी लागते. 'सुरुवातीला तीन लाख रुपये गुंतवून सुरक्षित स्ट्रक्चर उभे केले की पुढे इन्कम चालू राहतो. खेकडा पालनातील वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि योग्य व्यवस्थापन केल्यास आपणास वर्षाला आठ लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न' मिळत असल्याचा अनुभव मयूर सांगतात.
advertisement
काटेकोर व्यवस्थापन आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
खेकडा पालनासारखी अभिनव आणि प्रयोगशील शेती करताना मयूर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी आणि काटेकोर व्यवस्थापनावर भर दिला आहे. खेकडा पालनामध्ये स्वतः तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी वन डे ट्रेनिंग कोर्स उपलब्ध केला आहे. ट्रेनिंग कोर्सच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना, नवउद्योजकांना खेकडा पालनाविषयी मार्गदर्शन दिले आहे. तसेच व्यावसायिक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये देखील खेकडा पालनाविषयी मार्गदर्शक म्हणून मयूर जगदाळे यांना आवर्जून निमंत्रित केले जाते. यामुळे मयूर यांच्या अभ्यास आणि अनुभवाचा फायदा राज्यासह ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील कित्येक लोकांनी घेतला आहे. इच्छुक लोकांना प्रशिक्षण तसेच सुरुवातीला नर-मादी खेकडे, उपलब्ध जागेनुसार व गुंतवणुकीच्या तयारीनुसार स्ट्रक्चर, तांत्रिक माहिती आणि आहार व्यवस्थापना संदर्भातील सूचना मयूर प्रशिक्षणाद्वारे देत आहेत.
advertisement
लाखोंची नोकरी करत चाकोरीबद्ध जगण्यात कधीच रस नसल्याने कोरोना लॉकडाऊनचा फायदा घेत मयूर गावाकडे राहिले. कुटुंबीयांचा पाठिंबा, नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची आवड आणि अगदी कळत्या वयापासून शेतामध्येच वेगळे आणि उत्तम काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांना आज लाखोंच्या नफ्यासह अभ्यासू शेतकरी आणि तज्ञ उद्योजक बनण्यापर्यंत घेऊन गेले आहे. यशस्वी खेकडा शेतीच्या प्रयोगातून तुटीच्या पारंपरिक जोडधंद्यांना पर्यायी जोडधंदा म्हणून खेकडा शेतीकडे लक्ष वेधणारे मयूर आज कित्येक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Crab Farming: नोकरीचा नाद सोडला, इंजिनिअर तरुणानं लावलं डोकं, खेकडा शेतीतून लाखोंची कमाई, काय केलं? Video
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement