Soyabean Rate : अंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण,देशात काय परिमाण होणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Rate Update : अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दारावर होताना दिसत आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर आज पुन्हा घसरले आहेत.
मुंबई : अमेरिकामध्ये सोयाबीन काढणीला गती आली आहे. तसेच तेथील सोयाबिनीचे उत्पादन देखील चांगल्या प्रमाणात होत आहे. अशातच अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दारावर होताना दिसत आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर आज पुन्हा घसरले आहेत. ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे. या महिन्यात कृषी उत्पन्न बाजारातील सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली आहे. आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी महिनाअखेरीस सुरू होईल. सरकारने सोयाबीनचा आधारभूत भाव 4892 रुपये निश्चित केला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. तर मध्यप्रदेशातील सोयाबीन खरेदी 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
या खरेदीपूर्वी सोयाबीनचे दर कमी राहिले आहेत. किमान आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी झाल्यानंतर दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. 25 ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किमतीवर खरेदी सुरू झाल्यानंतर सोयाबीनचे दर वाढतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ₹ 5000 पेक्षा जास्त असण्याची शक्यता बाजार विश्लेषणातून व्यक्त केली जात आहे.
advertisement
14 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के केले आहे. आयात शुल्क वाढवण्याच्या घोषणेमुळे रिफाइंड सोयाबीन तेलाच्या दरात आठवड्यात 25 ते 30 रुपयांनी वाढ होणार आहे. प्रति लिटर वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाली असली तरी सोयाबीनच्या बाजारभावात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. याचे कारण म्हणजे सरकारने सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याआधी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आयातित खाद्यतेलाचा साठा शून्य टक्के आणि 12.5 टक्के मूलभूत कस्टम ड्युटीसह उपलब्ध होईपर्यंत प्रत्येक तेलाची एमआरपी कायम ठेवण्याचे निर्देश सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दिले आहेत.
advertisement
दरम्यान, केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विशेषत: गव्हाच्या दरात 130 रुपयांची वाढ केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2024 6:54 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : अंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण,देशात काय परिमाण होणार?