Soybean Price: अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांसमोर नवं संकट, सोयाबीनच्या भावात मोठी घसरण, कोणत्या मार्केटमध्ये किती दर? Video

Last Updated:

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील अर्धा खरीप वाया गेलाय. सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.

+
सोयाबीन 

सोयाबीन 

मुंबई: अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील अर्धा खरीप वाया गेलाय. शासकीय आकडेवारीनुसार 47 टक्के क्षेत्रावर पाणी फिरल्याने 146 लाख हेक्टर पैकी 68.72 लाख हेक्टर वरील खरीप शेतातच वाहून, कुजून गेलाय. खरिपाच्या भरवशावर असणारे जवळपास 34 जिल्हे नुकसान सोसत असल्याने बाजारात शेतमालाची आवक कमीच दिसते. अशा स्थितीत देखील काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी वाचवलेले सोयाबीन विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.
मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी वाशिम जिह्यात सर्वाधिक 1147 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वात कमी 1 क्विंटलची आवक नाशिक बाजार समितीमध्ये झाली. तसेच यवतमाळ बाजार समितीने दिलेला 4450 रुपये प्रतिक्विंटल आजचा सर्वसाधारण उच्चांकी भाव ठरला. आणि अहिल्यानगर पेठेमध्ये दिलेला केवळ 2050 रुपये प्रतिक्विंटल सर्वात कमी बाजार भाव ठरला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 4350 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
advertisement
भिजलेल्या सोयाबीनला जास्त दर नाही
व्यापाऱ्यांच्या मते, हमीभाव जरी 5328 रुपये प्रति क्विंटल असला तरी पावसामुळे भिजलेल्या सोयाबीनला तसा दर मिळणे शक्य नाही. बाजारात सध्या उपलब्ध सोयाबीन ओलसर असल्याने सोयाबीनचे सर्वसाधारण भाव 2050 ते 4450 रुपयांपर्यंतच आहेत.
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Price: अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांसमोर नवं संकट, सोयाबीनच्या भावात मोठी घसरण, कोणत्या मार्केटमध्ये किती दर? Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement