ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी? आवश्यक कागदपत्रे कोणते?

Last Updated:

Agriculture News : अलीकडच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना अनेक जण गुंतवणुकीसाठी ग्रामीण भागातील किंवा ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी खरेदी करत आहेत.

agriculture news
agriculture news
मुंबई : अलीकडच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना अनेक जण गुंतवणुकीसाठी ग्रामीण भागातील किंवा ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी खरेदी करत आहेत. कमी दरात अधिक भूखंड मिळतो आणि भविष्यात त्या भागाचा विकास होण्याची शक्यता असते. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा गुंतवणुकीऐवजी फसवणूक होण्याची शक्यता असते.
ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
जमिनीचा प्रकार तपासा
ग्रामपंचायत हद्दीतील अनेक जमिनी या शेतीयोग्य (बागायत/जिरायत) असतात. अशा जमिनीवर घरबांधणी करता येईल की नाही हे पाहण्यासाठी ती जमीन ‘एन.ए.’ (Non-Agricultural) करण्यात आली आहे का, हे तपासणे गरजेचे असते.
7/12 उतारा व फेरफार नोंदणी
जमिनीचा 7/12 उतारा (सातबारा) व त्यावर झालेल्या फेरफारांची माहिती (8अ) तपासा. त्यावर मालकाचे नाव, क्षेत्रफळ, आणि कोणतेही बंधन आहे का, याची माहिती मिळते.
advertisement
जमिनीचा मालकीहक्क स्पष्ट आहे का?
जमीन विकणारा व्यक्ती खरा मालक आहे का, त्याचा वारसाहक्क आहे का, हे महत्त्वाचे आहे. कुणी तिसऱ्या पक्षावरून किंवा वकीलमार्फत जमीन विकत असेल, तर त्याचे अधिकृत अधिकार आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे.
गाव नमुना 8 अ व फेरा फॉर्म तपासावा
ही कागदपत्रे शेतजमिनीच्या व्यवहारातील आवश्यक बाबी दाखवतात. फेरफार नोंदीत तक्रारी किंवा वाद आहेत का, हे बघणं गरजेचं आहे.
advertisement
भूमापन (मोजणी) अहवाल तपासा
जमीन मोजणी झाली आहे का? जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट आहेत का, यासाठी भूमापन खात्याचा अधिकृत नकाशा आणि अहवाल पहावा.
बांधकाम परवानगी किंवा एन.ए. ऑर्डर आहे का?
जर तुम्ही घर/फार्म हाउस बांधण्याचा विचार करत असाल, तर ती जमीन एन.ए. आहे का, हे तपासावे. बांधकामासाठी ग्रामपंचायत किंवा तालुका पातळीवर मिळालेली परवानगी आहे का, हे बघणे गरजेचे आहे.
advertisement
ग्रामपंचायतचा नOC (No Objection Certificate)
काही प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक असते, विशेषतः पाणी, रस्ता, वीजजोडणीसाठी.
आवश्यक कागदपत्रांची यादी 
7/12 उतारा (सातबारा)
8 अ उतारा
फेरफार उतारे
जमीन मालकीचा दाखला
जमीन मोजणी नकाशा
एन.ए. आदेश (जर बांधकामासाठी असेल तर)
विक्री करारनामा (Sale Deed)
ग्रामपंचायत NOC
वारसाहक्क प्रमाणपत्र (जर वारसदारांकडून विक्री होत असेल तर)
advertisement
टॅक्स पावत्या आणि पाणी/वीज बिलांची प्रती
दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना केवळ भाव किंवा क्षेत्रफळ पाहून निर्णय घेऊ नये. सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करून, स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊनच जमीन खरेदी करावी.
मराठी बातम्या/कृषी/
ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी? आवश्यक कागदपत्रे कोणते?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement