Agriculture News : शेतकऱ्यांनो हरभरा पेरणी करताय? वाणांची निवड करतांना घ्या ही काळजी, मिळेल भरघोस उत्पादन, Video

Last Updated:

हरभरा हे राज्यातील प्रमुख रब्बी पीक आहे. यंदा लांबलेल्या हंगामात हरभरा पिकाचे कोणकोणते विकसित वाण आहेत पाहुयात.

+
News18

News18

जालना : राज्यात अगदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला. यामुळे शेतीची अनेक गणितं देखील बिघडली आहेत. रब्बी हंगाम लांबला असून कोरडवाहू पेरणीची तारीख देखील संपली आहे. परंतु, अशाही परिस्थितीत शेतकरी नवीन हंगामासाठी तयार झाले असून रब्बी पेरणी करताना पहायला मिळत आहे. हरभरा हे राज्यातील प्रमुख रब्बी पीक आहे. यंदा लांबलेल्या हंगामात हरभरा पिकाचे कोणकोणते विकसित वाण आहेत? याबद्दल लोकल18 ने कृषी तज्ज्ञ एस. व्ही. सोनुने यांच्याकडून माहिती घेतली.
विजय: लहान दाण्याचे, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय वाण, उत्पादन हेक्टरी 25 ते 30 क्विंटल. याचबरोबर दिग्विजय, जॅकी 9218, PDKV कनक ही वाणे शेतकरी वापरू शकतात. बागायती हरभरा वाण फुले विक्रम, फुले विक्रांत ही दोन वाण उत्तम आहेत. फुले विक्रम हा वाण उंच वाढणारा असून याची हार्वेस्टिंग मशीनद्वारे करता येते. तर फुले विक्रांत उशिरा पेरणीसाठी देखील वापरता येतो. या दोन्ही वाणाचे बियाणे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना इथे उपलब्ध आहे.
advertisement
फुले विश्वनाथ: हे देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वाण लोकप्रिय आहे. कोरडवाहू जमीनसाठी अतिशय उपयुक्त. काबुली हरभऱ्याच्या सुधारित जाती PKV काबुली 2, PKV काबुली 4, विराट, फुले कृपा, BDNG 798 या जाती प्रचलित असून शेतकरी या वाणांची निवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतकऱ्यांनो हरभरा पेरणी करताय? वाणांची निवड करतांना घ्या ही काळजी, मिळेल भरघोस उत्पादन, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement