Science : विजेची तार उघड्यावर असूनही पक्षाना शॉक का लागत नाही? कधी असा विचार केलाय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का, की जर चुकून आपला हात त्या उघड्या तारेला लागला, तर आपल्याला जोराचा झटका बसतो, पण हे पक्षी मात्र तासनतास त्या तारेवर आरामात बसतात? त्यांना हलकाफुलका करंट देखील लागत नसेल का?
आपण अनेकदा संध्याकाळी घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत उभे राहतो तेव्हा समोरच्या विजेच्या तारांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेले दिसतात. कधी विचार केलाय का, की जर चुकून आपला हात त्या उघड्या तारेला लागला, तर आपल्याला जोराचा झटका बसतो, पण हे पक्षी मात्र तासनतास त्या तारेवर आरामात बसतात? त्यांना हलकाफुलका करंट देखील लागत नसेल का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विद्युत प्रवाह वाहण्यासाठी त्याला 'रस्ता' लागतो. जेव्हा एखादा पक्षी विजेच्या एका तारेवर बसतो, तेव्हा त्याचे दोन्ही पाय एकाच तारेवर असतात. यामुळे विजेचा प्रवाह पक्ष्याच्या शरीरातून जातो खरा, पण त्याला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नाही. जोपर्यंत वीज पक्ष्याच्या शरीरातून जमिनीपर्यंत किंवा दुसऱ्या विरुद्ध तारेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत सर्किट पूर्ण होत नाही आणि पक्ष्याला शॉक लागत नाही.
advertisement
advertisement
असं नाही की पक्ष्यांना कधीच शॉक लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मोठ्या झाडांजवळ किंवा खांबांजवळ पक्षी मृत पडलेले असतात. हे तेव्हाच घडतं जेव्हा पक्ष्याचा एक पाय किंवा पंख एका तारेला आणि शरीराचा दुसरा भाग दुसऱ्या तारेला (Neutral wire) लागतो किंवा, पक्षी तारेवर बसलेला असताना त्याची चोच किंवा पंख चुकून वीज खांबाला (जो जमिनीशी जोडलेला असतो) त्याला लागतात. अशा वेळी सर्किट पूर्ण होतं आणि पक्ष्याला जोराचा झटका बसतो.
advertisement
माणसाच्या बाबतीत काय होतं?आपण जमिनीवर उभे असतो. जेव्हा आपला हात तारेला लागतो, तेव्हा आपल्या शरीरातून वीज प्रवाहित होऊन थेट जमिनीकडे जाते. यामुळे आपल्या शरीरातून विजेचं 'सर्किट' पूर्ण होतं आणि आपल्याला जबरदस्त शॉक बसतो. जर आपणही हवेत लटकून एकाच तारेला पकडलं आणि आपला जमिनीशी किंवा दुसऱ्या कशाशीही संपर्क नसेल, तर आपल्यालाही शॉक लागणार नाही (पण असं धाडस चुकूनही करू नका).
advertisement









