तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार की नाही? 2 मिनिटांत चेक करा

Last Updated:

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच म्हणजेच पुढील काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच म्हणजेच पुढील काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सध्या पात्र शेतकऱ्यांचे एफटीओ (Fund Transfer Order) जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपला हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे का, तसेच एफटीओ तयार झाला आहे का, हे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने सहज तपासू शकतात.
हप्ता जमा होणार आहे का हे कसे तपासाल?
सर्वप्रथम NSMNY या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. संकेतस्थळावर गेल्यानंतर Beneficiary Status नावाची विंडो दिसेल.येथे लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असतात. नोंदणी क्रमांक, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक
योग्य पर्याय निवडून पहिल्या रकान्यात मोबाईल नंबर टाकावा. खालील रकान्यात दिलेला कॅप्चा कोड भरावा. नंतर Get Aadhaar OTP या पर्यायावर क्लिक करावा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून व्हेरिफाय करावे.
advertisement
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपला Beneficiary Status दिसून येईल. यात शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर तसेच आतापर्यंत मिळालेले हप्त्यांची माहिती तपशीलवार पाहता येते. यामध्ये Eligibility Details हा पर्याय असेल तर शेतकरी पात्र असल्याचे समजावे. परंतु जर Ineligibility असा पर्याय दिसला, तर शेतकरी अपात्र ठरलेला आहे, आणि त्यामागचे कारणही दाखवले जाईल.
advertisement
एफटीओ जनरेट झाला आहे का हे कसे तपासाल?
सर्वप्रथम PFMS (Public Financial Management System) या पोर्टलला भेट द्यावी. तेथे Payment Status या विभागातील DBT Status Tracker हा पर्याय निवडावा. पुढे Category या विभागात जाऊन DBT NSMNYS Portal हा पर्याय निवडावा. त्यानंतर Payment या पर्यायावर क्लिक करावा. पुढील रकान्यात आपला नोंदणी क्रमांक टाकावा. कॅप्चा कोड भरून Submit वर क्लिक करावे.
advertisement
सबमिट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये एफटीओची संपूर्ण माहिती दिसेल. जर शेतकऱ्याचा एफटीओ जनरेट झाला असेल, तर ते स्पष्टपणे दाखवले जाईल. ज्या शेतकऱ्यांचा एफटीओ अजून तयार झालेला नाही, त्यांना जुने हप्तेच दिसतील. नवीन हप्त्यासाठी एफटीओ तयार न झाल्यास त्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही किंवा तो अपात्र ठरलेला आहे, असे समजावे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
राज्यातील जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांनी नियमितपणे आपला Beneficiary Status आणि एफटीओ माहिती तपासावी. यामुळे हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे का? हे आधीच कळेल.
advertisement
सातवा हप्ता मिळाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, विशेषतः अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठा आधार ठरणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार की नाही? 2 मिनिटांत चेक करा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement