TRENDING:

Stocks to Watch: या 11 शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, आज बाजारात धडाका; तुमचा पोर्टफोलिओ तयार आहे का?

Last Updated:

Share Market Prediction: गुरुवारी शेअर बाजारात 11 मोठ्या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहणार आहेत. ब्लॉक डील, FDA मंजुरी, बोनस जाहीर, ग्लोबल करार यांसारख्या बातम्यांचा थेट परिणाम या स्टॉक्सवर दिसू शकतो.

advertisement
Stock Market News in Marathi
Stock Market News in Marathi
advertisement

मुंबई: बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. आता बाजाराची नजर आज गुरुवारी होणाऱ्या सत्रावर आहे. त्यात निफ्टीची दिशा आणि काही खास स्टॉक्सवर लक्ष असेल. कारण बुधवारी व्यापार संपल्यानंतर या कंपन्यांबाबत मोठ्या बातम्या आल्या आहेत.

advertisement

Polycab India

सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी पॉलीकॅब इंडिया मध्ये 880 कोटींची ब्लॉक डील होऊ शकते. या डीलअंतर्गत प्रमोटर्स 12 लाख शेअर्स विकू शकतात. ब्लॉक डीलसाठी 7,300 प्रति शेअर फ्लोर प्राइस ठेवण्यात येऊ शकतो.

advertisement

Lupin

ल्युपिन कंपनीने बुधवारी सांगितले की- त्यांना अमेरिकेच्या FDA कडून HIV औषधाच्या जनरिक व्हर्जनसाठी तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. हे औषध कंपनीच्या नागपूर प्लांटमध्ये तयार केले जाणार आहे.

Tata Steel Ltd

टाटा स्टीलने बुधवारी जाहीर केले की-त्याने आपल्या परदेशी युनिट T Steel Holdings Pte. Ltd (TSHP) मध्ये नवीन भांडवल घातले आहे. कंपनीने 457.7 कोटी इक्विटी शेअर्स सुमारे 4,054.66 कोटींना अधिग्रहित केले आहेत.

advertisement

Poly Medicure

पॉली मेडिक्युअर कंपनीने बुधवारी जाहीर केले की- तिने Medistream SA मध्ये 100% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी करार केला आहे. Medistream SA ही Citieffe SRL आणि तिच्या अमेरिका व मेक्सिकोतील सब्सिडियरीजची होल्डिंग कंपनी आहे. या अधिग्रहणाची किंमत अंदाजे 324 कोटी (31 दशलक्ष युरो) आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, एका महिन्यात हा कंपनीचा दुसरा अधिग्रहण करार आहे.

advertisement

Newgen Software Technologies

न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज (UK) लिमिटेड जी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडची पूर्ण मालकीची सब्सिडियरी आहे. त्यांनी Tata Consultancy Services N.V, Belgium सोबत मास्टर सर्विस करार केला आहे. या कराराची एकूण किंमत जवळपास 4.2 दशलक्ष युरो ( 42 लाख युरो) आहे.

SMC Global Securities

एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजने बुधवारी बोनस देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जाहीर केले की- बोर्डाच्या बैठकीत 2 फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर 1 बोनस शेअर देण्यास मंजुरी देण्यात आली. बोनससाठी रेकॉर्ड डेट लवकरच जाहीर केली जाईल.

Birla Corporation

बिर्ला कॉर्पोरेशनच्या पूर्ण मालकीच्या सब्सिडियरी RCCPL Pvt. Ltd ला तेलंगणाच्या मायन्स डिपार्टमेंटकडून आदिलाबाद जिल्ह्यातील कनपा-जुनापानी चुनखडीचा ब्लॉक मिळाला आहे. यासाठी त्यांना "प्रिफर्ड बिडर" घोषित करण्यात आले आहे.

Glenmark Pharma

ग्लेनमार्क फार्माच्या सब्सिडियरी कंपनीने Hengrui Pharma सोबत एका औषधासाठी एक्सक्लूसिव्ह लायसेंसिंग करार केला आहे. या करारानुसार ग्लेनमार्कला अनेक जागतिक क्षेत्रांमध्ये त्या औषधाचा विकास आणि व्यावसायिक लॉंच करण्याचे हक्क मिळतील.

IPCA Labs

IPCA Labs ने अमेरिकन कंपनी BioSimilar Sciences सोबत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि संयुक्त विकास करार केला आहे. हा करार कॅन्सर आणि ऑटोइम्यून डिसीजेस टार्गेट करणाऱ्या नेक्स्ट जनरेशन मोनोक्लोनल अँटीबॉडी बायोसिमिलरवर केंद्रित आहे.

Dalmia Bharat

डालमिया भारत कंपनीने सांगितले की- त्यांना PMLA कायद्यानुसार एक ऑर्डर प्राप्त झाली आहे. यात ईडी (Enforcement Directorate) ने 377.26 कोटींच्या जमिनीचे तात्पुरते जप्ती आदेश दिले आहेत. हा आदेश 23 सप्टेंबर रोजी मिळाला.

Piramal Enterprises

पिरामल एंटरप्रायझेसला NCLT कडून पिरामल फायनान्ससोबत विलीनीकरणाची मंजुरी मिळाली आहे.

पॉलीकॅबच्या ब्लॉक डीलपासून ल्युपिनच्या FDA मंजुरीपर्यंत, टाटा स्टील, ग्लेनमार्क, IPCA यांसारख्या कंपन्यांच्या निर्णयांमुळे पुढील सत्रात बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते.

मराठी बातम्या/मनी/
Stocks to Watch: या 11 शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, आज बाजारात धडाका; तुमचा पोर्टफोलिओ तयार आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल