आजचे सोयाबीन बाजारभाव
१० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या बाजारभावांनुसार, जळगाव जिल्ह्यात सोयाबीनला ४,००० ते ४,४८५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. नागपूरमध्ये दर ३,९०० ते ४,५५२ रुपयांच्या दरम्यान आहे, तर पालम बाजारात सोयाबीनला ४,५०० रुपये दर कायम आहे. दरांचा हा कल पाहता, सध्या बाजारात ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल इतका सरासरी दर दिसून येतो.
advertisement
बाजारातील सध्याची परिस्थिती
सोयाबीनचे दर सध्या ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. काही ठिकाणी दर्जानुसार थोडाफार फरक दिसून येत आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला जास्त भाव मिळत असला तरी, आवक वाढल्यामुळे दरात स्थिरता आहे.
शेतकऱ्यांची मागणी काय?
सध्याच्या दराने उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. खत, मजुरी आणि वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना किमान ५,५०० रुपये दर अपेक्षित आहेत. मात्र बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे अपेक्षेने पाहत आहेत.
१५ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होणार
राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार, १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदीला सुरुवात होईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे, हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या उत्पादनानुसार खरेदी केंद्रावर वेळापत्रक दिले जाईल.
