बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्यानंच नाव काढलं, मालकाला केलं मालामाल, खुराक माहित आहे का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगलीत श्रीनाथ केसरी स्पर्धेत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल जोडीनं पहिला क्रमांक मिळवत फॉर्चयुनर पटकावली आहे. यामुळे सध्या हेलिकॉप्टर बैज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
advertisement
1/7

रविवारी रात्री उशिरापर्यंत श्रीनाथ केसरी बैलगाडा आणि शिवसेना बैलगाडा शर्यती पार पडल्या. शिवसेना नेते पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शर्यती पार पडल्या. यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला.
advertisement
2/7
सांगलीत श्रीनाथ केसरी स्पर्धेत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल जोडीनं पहिला क्रमांक मिळवत फॉर्च्युनर पटकावली आहे. यामुळे सध्या हेलिकॉप्टर बैज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शिरोळमधील बाळू दादा हजारे यांच्या मालकीच्या हेलिकॉप्टर बैज्यानं आजपर्यंत एकूण कोट्यवधींची बक्षीसं जिंकली आहेत. चार वर्षांत त्यानं दीडशेपेक्षा जास्त मैदानांत भाग घेतल्याचे बैलगाडा प्रेमींच्या वर्तुळातून बोललं जातं.
advertisement
3/7
ट्रॅक्टर, थार आणि आता तर फॉर्च्युनर गाडीही बैज्याने जिंकली आहे. याशिवाय लाखोंची बक्षीसं असलेली मैदानं मारली आहेत. तर कित्येक गदा जिंकल्या आहेत आणि मानाच्या मैदानात नंबर मारला आहे.
advertisement
4/7
जनरलला पळणाऱ्या बैलांसोबत पळाला आहे. दोन्ही बैलांनी दोन-तीन वेळा वगळता वर्षभर पहिलाच नंबर काढला आहे. बैज्याच्या देखभालीसाठी दोघं-तिघं जण असतात.
advertisement
5/7
बाळू हजारे सांगतात की, सोमवारी बैलांना औताला जुंपत नाही. शर्यतीचा बैल औतात घटवायला लागतो. बैज्याला एक दिवस आड अर्धा तास औताला जुंपला जातो. बैज्याला खायला काही वेगळं घालत नाही. चारा, जनावराचं नेहमीचं खाद्य दिलं जातं. काय घालेल ते खातो. काही बैलांना दूध पाजलं जातं पण बैज्याला दूध पाजलं जात नाही.
advertisement
6/7
बैज्या तुफान पळतोय आणि हेलिकॉप्टरसारखा जातोय म्हणून तसं नाव पोरांनीच ठेवलं. एकानं नाव टाकलं आणि सगळ्यांनीच हेलिकॉप्टर बैज्या म्हणायला चालू केलं.
advertisement
7/7
हेलिकॉप्टर बैजाचे मालक शेतकरी असून ते गावचे सरपंचसुद्धा आहेत. त्यांचा दुधाचा टँकर आणि चिलिंग प्लांटदेखील आहे. साडेसहा लाख रुपयांना त्यांनी बैज्याची खरेदी केली होती. त्याचं बैज्यानं आजपर्यंत त्यांना कोट्यवधींची संपत्ती आणि सुप्रसिद्ध नाव मिळवून दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्यानंच नाव काढलं, मालकाला केलं मालामाल, खुराक माहित आहे का?