TRENDING:

Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देतं धाडस दाखवलं, 43 जातींच्या आंब्यांची फुलवली आमराई, वर्षाला 80 लाख रुपयांचा नफा

Last Updated:
त्यांनी अवघ्या साडेआठ एकर क्षेत्रात 43 पेक्षा अधिक जातींच्या आंब्यांची भव्य आमराई फुलवली आहे. या बागेतून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.
advertisement
1/5
पारंपरिक शेतीला फाटा देतं धाडस दाखवलं, 43 जातींच्या आंब्यांची फुलवली आमराई, वर्षाला 80 लाख रुपयांचा नफा
शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी असाच प्रयोग केला आहे. त्यांनी अवघ्या साडेआठ एकर क्षेत्रात 43 पेक्षा अधिक जातींच्या आंब्यांची भव्य आमराई फुलवली आहे. या बागेतून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.
advertisement
2/5
2018 साली दत्तात्रय गाडगे यांनी साडेआठ एकर क्षेत्रात आंब्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी योग्य नियोजन करून बाग उभी केली. आज त्यांच्या आमराईत सुमारे 11 हजार आंब्याची झाडे आहेत. विशेष म्हणजे या बागेत केशर, लंगडा, जम्बो केशर, नीलम, रत्ना यांसह तब्बल 43 विविध जातींचे आंबे आहेत.
advertisement
3/5
दत्तात्रय गाडगे यांच्या शेतीमुळे अरण गावात जणू कोकणच तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यांना आमराईतील प्रत्येक झाडापासून सरासरी 100 किलोपर्यंत आंब्याचे उत्पादन मिळते. विविध जातींची लागवड केल्यामुळे बाजारपेठेतही या आंब्यांना चांगली मागणी मिळते. त्यामुळे उत्पादनासोबतच उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.
advertisement
4/5
दत्तात्रय गाडगे हे त्यांच्या बागेत कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरत नाहीत. ते या शेतीला पिकवण्यासाठी सेंद्रिय खतांसह होमिओपॅथी औषधांचा वापर करून आंब्यांची निगा राखतात. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते. याशिवाय त्यांनी स्वतः विकसित केलेला शरद मॅंगो हा आंब्याचा नवीन वाण देखील तयार केला आहे.
advertisement
5/5
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावावरून या वाणाला शरद मॅंगो असे नाव देण्यात आले असून या वाणाचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. नव्या प्रयोगांच्या जोरावर गाडगे यांनी शेतीतून मोठे आर्थिक यश मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देतं धाडस दाखवलं, 43 जातींच्या आंब्यांची फुलवली आमराई, वर्षाला 80 लाख रुपयांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल