TRENDING:

भारतापासून फक्त 5 तासांचा प्रवास आणि खर्च अगदी कमी; जगातील स्वस्त देश कुठे आहे?

Last Updated:
जर तुम्हाला सांगितलं की, भारताच्या अगदी जवळ असा एक देश आहे जिथे जाण्यासाठी 5 तासांपेक्षाही कमी वेळ लागतो आणि तिथला एकूण खर्च तुमच्या नेहमीच्या बजेटमध्येच बसेल?
advertisement
1/7
भारतापासून फक्त 5 तासांचा प्रवास आणि खर्च अगदी कमी; जगातील स्वस्त देश कुठे आहे?
आपल्यापैकी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आयुष्यात एकदा तरी 'फॉरेन' ट्रिप करायची. पण जेव्हा आपण प्लॅनिंग करायला घेतो, तेव्हा विमानाची महागडी तिकिटं, व्हिसाची कटकट आणि परदेशातील हॉटेलचा खर्च पाहून आपण आपलं स्वप्न गुंडाळून ठेवतो आणि शेवटी लोणावळा किंवा महाबळेश्वरचा बेत आखतो. पण, जर तुम्हाला सांगितलं की, भारताच्या अगदी जवळ असा एक देश आहे जिथे जाण्यासाठी 5 तासांपेक्षाही कमी वेळ लागतो आणि तिथला एकूण खर्च तुमच्या नेहमीच्या बजेटमध्येच बसेल?
advertisement
2/7
हो, आपण बोलतोय दक्षिण-पूर्व आशियातील निसर्गाचं लेणं लाभलेल्या 'लाओस' (Laos) या देशाबद्दल. ऑक्टोबर 2025 आणि फेब्रुवारी 2026 च्या ताज्या अहवालानुसार, लाओस हा जगातील सर्वात 'अफोर्डेबल' म्हणजेच स्वस्त देशांपैकी एक ठरला आहे. विरंगुळा, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य शोधणाऱ्या भारतीय पर्यटकांची आता या देशाला पहिली पसंती मिळत आहे.
advertisement
3/7
1. निसर्गाचं वरदान: डोंगर, दऱ्या आणि मेकाँग नदीलाओस हा चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला देश आहे. या देशाचा 75% भाग हा घनदाट जंगलं आणि उंच पहाडांनी व्यापलेला आहे. उत्तर भागात विस्तीर्ण पर्वत रांगा आहेत, तर मेकाँग नदी या देशाची जीवनवाहिनी आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांततेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल, तर लाओससारखा दुसरा देश नाही.
advertisement
4/7
2. समृद्ध संस्कृती आणि बौद्ध वारसालाओसची संस्कृती ही बौद्ध धर्मात खोलवर रुजलेली आहे. या देशाची अधिकृत भाषा 'लाओ' ही थाई भाषेशी मिळतीजुळती आहे. हे ठिकाण UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे. इथे हजारो प्राचीन बौद्ध मंदिरे आहेत, जी तुमचं मन मोहून टाकतील. इथले लोक अत्यंत साधे जीवन जगतात. रेशीम उत्पादन आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. 'पी माई लाओ' (लाओ नववर्ष) आणि पारंपारिक नौका शर्यत हे येथील प्रमुख सण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत.
advertisement
5/7
3. पर्यटकांसाठी का आहे खास?लाओस सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी कंबर कसली आहे. चीन-लाओस रेल्वे सुरू झाल्यामुळे आता या देशात प्रवास करणे अधिक सोपे झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत 50 ते 60 लाख पर्यटक लाओसमध्ये येतील असा अंदाज आहे. भारताच्या तुलनेत इथले खाणे-पिणे आणि राहणे अत्यंत स्वस्त आहे. 16.32 अब्ज इतकी नॉमिनल जीडीपी असलेला हा देश वेगाने प्रगती करत आहे, पण तरीही पर्यटकांच्या खिशाला तो परवडणारा आहे.
advertisement
6/7
4. जनसांख्यिकी आणि हवामानलाओसची लोकसंख्या 2026 च्या मध्यापर्यंत 7.97 दशलक्ष (जवळपास 80 लाख) इतकी आहे. विशेष म्हणजे येथील सरासरी वय 25.3 वर्षे आहे, म्हणजेच हा तरुणांचा देश आहे. कधी जाल? मे ते नोव्हेंबर दरम्यान पावसाळा असतो, तर डिसेंबर ते एप्रिल हा काळ लाओस फिरण्यासाठी सर्वात उत्तम आहे.
advertisement
7/7
जर तुम्हाला कमी खर्चात आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल, तर लाओसचा पर्याय नक्की निवडा. मेकाँग नदीच्या काठावर बसून सूर्यास्त पाहणे किंवा प्राचीन मंदिरांमधील शांततेचा अनुभव घेणे, हा तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
भारतापासून फक्त 5 तासांचा प्रवास आणि खर्च अगदी कमी; जगातील स्वस्त देश कुठे आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल