वयाच्या 41 व्या वर्षी आई होणार ही टेलिव्हिजन अभिनेत्री, लग्नाच्या 10 वर्षांनी हलणार पाळणा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी त्यांच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. नुकतीच त्यांची ही गुड न्यूज चाहत्यांसमोर आली.
advertisement
1/11

लग्न आणि करिअर या सगळ्याचा समतोल साधत कलाकार मंडळी आपलं आयुष्य जगत असतात. अशातच एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/11
टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी लवकरच आई-बाबा होणार आहेत. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे.
advertisement
3/11
दिव्यांका आणि विवेक यांच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर ते आई-बाबा होणार आहेत. दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दिव्यांका किंवा विवेक या दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
advertisement
4/11
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितलं की दिव्यांका आणि विवेक त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी तयारी सुरू केली आहे.
advertisement
5/11
असे वृत्त आहे की दिव्यांका आणि विवेक लवकरच डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. हा एक खाजगी कार्यक्रम असेल ज्यात केवळ कुटुंबातील सदस्य आणि खूप जवळचे मित्र उपस्थित राहतील.
advertisement
6/11
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर दोघेही त्यांची ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर करतील असं म्हटलं जात आहे.
advertisement
7/11
दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर होळीचे फोटो एका भावनिक कॅप्शनसह शेअर केले आहेत. यावर्षी महाराष्ट्रात ३ मार्च रोजी होळी साजरी झाली आणि या निमित्ताने दिव्यांकाने तिच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
8/11
दिव्यांकाने टेलिव्हिजनच्या जगात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. 'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेत विद्या आणि दिव्या या दुहेरी भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
advertisement
9/11
त्यानंतर 'ये है मोहब्बतें' या मालिकेत डॉ. इशिता भल्लाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.
advertisement
10/11
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी 2016 मध्ये लग्न केले. दिव्यांका केवळ अभिनयातील स्टारच नाही तर रिॲलिटी शोची राणीसुद्धा आहे. 2017 मध्ये तिने तिचा पती विवेक दहियासोबत 'नच बलिये 8' ची ट्रॉफी जिंकली. 2021 मध्ये ती 'खतरों के खिलाडी 11' मध्ये दिसली.
advertisement
11/11
'ये है मोहब्बतें'च्या सेटवर दिव्यांका आणि विवेक यांची ओळख झाली. 16 जानेवारी 2016 रोजी दोघांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर 8 जुलैला दोघांचं लग्न झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 41 व्या वर्षी आई होणार ही टेलिव्हिजन अभिनेत्री, लग्नाच्या 10 वर्षांनी हलणार पाळणा