नवी मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबईच्या लोकलवर अपघात आणि दुर्घटना नव्या नाहीत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर खारघर रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं लोकल खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्याा माहितीनुसार, हार्बर मार्गावरील खारघर रेल्वे स्टेशनवर सायंकाळीच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्टेशनवर उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशानं लोकल समोर येत असताच समोर उडी मारून आत्महत्या केली. लोकल खाली सापडल्यामुळे या महिलेचा जागेवर मृत्यू झाला. तिच्या शरिराचे दोन तुकडे झाले होते.
advertisement
लोकलखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांनी घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेचा मृतदेह लोकलच्या रुळावरून बाहेर काढण्यात आला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या अपघाता मुळे हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. या महिलेची ओळख अद्याप पटली नसून पोलीस प्रयत्न करत आहे,
(सविस्तर बातमी लवकरच)
