Success Story : साप-कोल्ह्यांचा त्रास सहन केला, माशांनीही दंश मारला, पण शुभमने अखेर उभारला साखरेहून गोड बिझनेस!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शुभम यांनी फायर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून दोन वर्षे रिलायन्स पॉवर प्लांटमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/7

अनेक तरुण नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा या गावातील शुभम नंदकिशोर येणूरकर याने मधमाशी पालनाचा व्यवसाय उभा केला. शुभम यांनी फायर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून दोन वर्षे रिलायन्स पॉवर प्लांटमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/7
शुभम नंदकिशोर येणूरकर यांचा 2018-19 मध्ये मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू झाला. त्याला या व्यवसायासाठी त्याचा मोठा भाऊ सचिन नंदकिशोर येणूरकर याने मार्गदर्शन केलं. पुण्यात सात दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कृषी संमेलनातून 8 बॉक्स घेऊन या प्रवासाची सुरुवात झाली.
advertisement
3/7
सुरुवातीला शुभम यांनी 2 लाख रुपयांच्या बचतीतून 40 बॉक्स घेतले. यामध्ये 1.5 लाख रुपये बॉक्स खरेदीसाठी तर उर्वरित 50 हजार रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरले. परंतु सुरुवातीला नॉलेज कमी असल्याने पुस्तकातून शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उपयोगी पडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी विनामोबदला काम करून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
advertisement
4/7
यामध्ये टेंटमध्ये राहणे, साप-कोल्ह्यांचा त्रास, मधमाशांचा दंश सहन त्यांनी केला. यामध्ये ग्राहकांना समजावून घेणे अशा अनेक संकटांना तोंड त्यांनी दिले. स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवला. दिंडोरी (म.प्र.) ते ललितपूर या प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात मित्राचा मृत्यूही डोळ्यासमोर पाहिला. तरीही खचून न जाता त्यांनी या व्यवसायात आपली वाटचाल सुरू ठेवली.
advertisement
5/7
त्यांनी मधमाशी पालनातून केवळ मधच नव्हे तर मेण, बी पोलन, हनी कँडी, गिफ्ट पॅक, हनीकॉम्ब अशा विविध प्रॉडक्ट्सची निर्मिती होत असल्याचे त्यांनी अनुभवले. मेणावर आधारित कॉस्मेटिक आणि औषधनिर्मितीचे उत्पादन, तसेच पोलिनेशनसाठी पेट्या उपलब्ध करून देण्याचा नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला.
advertisement
6/7
2018-19 मध्ये सुरू झालेला त्यांचा आज 400 बॉक्सपर्यंत पोहोचला आहे. यामधून त्यांना दरवर्षी 12 ते 14 टन मध उत्पादन होत असून बी-टू-बी (होलसेल) व चिल्लर विक्री या दोन्ही माध्यमातून व्यवसाय वाढत आहे. यातून त्यांची वर्षाला 15 लाखांची उलाढाल होत आहे.
advertisement
7/7
शुभम यांनी या व्यवसायामधून पाच लोकांना रोजगार दिला आहे. विक्रीसाठी अमूल यांसारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच स्वतःचा The Hive Honey हा ब्रँड त्यांनी उभा केला आहे. मॉल, मेडिकल, तसेच विविध प्रदर्शन आणि स्टॉलच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : साप-कोल्ह्यांचा त्रास सहन केला, माशांनीही दंश मारला, पण शुभमने अखेर उभारला साखरेहून गोड बिझनेस!