TRENDING:

संगमनेर हादरले! सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अ‍ॅसिड हल्ला; शाळेतून घरी जाताना नराधमाचे कृत्य

Last Updated:

अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन चेहऱ्यावर अॅसीड फेकले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अ‍ॅसिड फेकून हल्ला केला आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना हा प्रकार घडला असून, या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तालुक्यात दोन दिवसांत घडलेल्या दुसऱ्या प्राणघातक हल्ल्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
News18
News18
advertisement

वडगाव पान येथील जिल्हा परिषद शाळेत ही मुलगी शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घराच्या दिशेने चालली होती. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात युवकाने अचानक तिच्यासमोर येऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. अ‍ॅसिड पडताच वेदनेने विव्हळत मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

advertisement

उपचारासाठी लोणीला हलवले

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी हलवले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या हल्ल्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

advertisement

तालुक्यात दहशतीचे वातावरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

दोन दिवसांपूर्वीच रणखांब गावात लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता एका शालेय विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने संगमनेर तालुका हादरला आहे. या नराधमाला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संगमनेर हादरले! सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अ‍ॅसिड हल्ला; शाळेतून घरी जाताना नराधमाचे कृत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल