TRENDING:

Success Story : शेतकऱ्याचा 10 गुंठ्यात प्रयोग भारी, केली कांदा अन् गुलछडीची आंतरपीक शेती, इतक्या लाखाचा नफा

Last Updated:
शेतामध्ये पारंपरिक कांदा पिकासोबत दहा गुंठ्यांमध्ये गुलछडीची लागवड केली आणि अवघ्या चार महिन्यांत लाखाचा नफा मिळवला आहे.
advertisement
1/7
शेतकऱ्याचा 10 गुंठ्यात प्रयोग भारी, केली कांदा अन् गुलछडीची आंतरपीक शेती, इतक्या लाखाचा नफा
बदलत्या काळानुसार शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. यामध्ये विविध पिके आणि आंतरपीक घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.
advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरीचे शेतकरी दत्तात्रय डोंगरे यांनीही शेतीत असा वेगळा प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पारंपरिक कांदा पिकासोबत दहा गुंठ्यांमध्ये गुलछडीची लागवड केली आणि अवघ्या चार महिन्यांत लाखाचा नफा मिळवला आहे.
advertisement
3/7
दत्तात्रय डोंगरे यांनी शेती करताना कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने पर्यायी उत्पन्नासाठी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला शेताची मशागत करून त्यामध्ये भरपूर शेणखत टाकत गुलछडीची लागवड केली.
advertisement
4/7
गुलछडीची लागवड करण्यासाठी दहा गुंठ्यांमध्ये 28 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. लागवडीनंतर सुमारे चार महिन्यांनी फुलांची तोडणी सुरू झाली. या कालावधीतच लागवडीचा खर्च निघून गेला आणि आतापर्यंत त्यांना सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.
advertisement
5/7
गुलछडीची झाडे एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षांपर्यंत उत्पन्न देतात. त्यामुळे पुढील काळातही कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातून या गुलछडीची विक्री थेट मुंबई येथील दादर फुलबाजारात केली जाते. सणासुदीच्या काळात गुलछडीला मोठी मागणी असते. यंदा 40 रुपये ते 150 रुपयांपर्यंत दर गुलछडीला मिळत आहे. सरासरी 60-70 रुपयांपर्यंत भाव मिळाला तरीही चांगले उत्पन्न होते, असं डोंगरे सांगतात.
advertisement
7/7
प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय डोंगरे सांगतात की, कांद्यासारख्या पिकासोबत आंतरपीक म्हणून गुलछडीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकतो. दरम्यान त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी गुलछडी लागवडीकडे वळण्याचा विचार करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शेतकऱ्याचा 10 गुंठ्यात प्रयोग भारी, केली कांदा अन् गुलछडीची आंतरपीक शेती, इतक्या लाखाचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल