Summer Tips : उन्हाळ्यात 'या' गोष्टींची घ्या काळजी! काम आणि व्यायाम करतानाही वाढणार नाही शरीराचं तापमान
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Summer tips to avoid rise in body temperature : उन्हाळयात आपल्याला आपल्या शरीराचं तापमान खुप जास्त सांभाळावं लागतं. त्यासाठी शरीर हायड्रेटेड राहणं तर आवश्यक आहेच. त्याचसोबत आणखीही काही गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
1/7

उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. आपण कधीकधी पाणी पिण्यास विसरतो किंवा दुर्लक्ष करतो. पण असं करू नये. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या.
advertisement
2/7
उन्हाळ्यात पाणी पिणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं कपड्यांचीयोग्य निवड आहे. कारण यामुळे शरीराच्या तापमानावर मोठा परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात घट्ट किंवा गडद रंग जास्त उष्णता शोषतात. म्हणून सैल, हलक्या रंगाचे कपडे घाला. जेणेकरून शरीर थंड राहील.
advertisement
3/7
उन्हाळ्यात तुम्हाला काही त्रास होत असेल आणि तो किरकोळ म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर असं करू नका. उन्हाळ्यात जास्त घाम, स्नायूंना पेटके, मळमळ किंवा चक्कर येणं या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
4/7
या काळात उष्ण पेय पिणं आपण टाळलं पाहिजे. म्हणजे कॅफिन किंवा अल्कोहोल जास्त प्रमाणात पिऊ नये. कारण यामुळे डिहायड्रेशन जास्त होऊ शकते. उलट उन्हाळ्यात पाणी, ताजे रस आणि इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय पिणं अधिक फायदेशीर आहे.
advertisement
5/7
उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना भूक लागेनाशी होते. यामुळं कधीकधी जेवण टाळलं जात. पण असं करू नये. या काळातही शरीराला ऊर्जा आणि पोषक तत्वांची खूप गरज असते. म्हणून या काळात हलकं का होईना पण जेवा. त्यासोबत फळं, भाज्या आणि पाणीयुक्त पदार्थ खा.
advertisement
6/7
उन्हाळ्यात खूप शारीरिक कष्ट किंवा व्यायाम केल्याने शरीराचे तापमान वाढण्याचं शक्यता असते. याचा परिणाम म्हणून हृदयावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे काम असेल किंवा व्यायाम हे सकाळी किंवा संध्याकाळच्या थोड्या थंड वातावरणात केलेलं चांगलं.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात 'या' गोष्टींची घ्या काळजी! काम आणि व्यायाम करतानाही वाढणार नाही शरीराचं तापमान