TRENDING:

Kalna Recipe : अस्सल विदर्भ स्टाईल, उन्हाळ्यात करा कळणा रेसिपी

Last Updated:
तुरीच्या डाळीपासून तयार होणारा हा पदार्थ चविष्ट, झणझणीत आणि पटकन तयार होणारा असल्यामुळे अनेक घरांमध्ये आवडीने बनवला जातो. भाकरीसोबत खाल्ल्यास या पदार्थाची चव आणखी वाढते.
advertisement
1/7
अस्सल विदर्भ स्टाईल, उन्हाळ्यात करा कळणा रेसिपी
विदर्भातील ग्रामीण भागात अनेक पारंपरिक पदार्थ आजही जपले गेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कळणा. तुरीच्या डाळीपासून तयार होणारा हा पदार्थ चविष्ट, झणझणीत आणि पटकन तयार होणारा असल्यामुळे अनेक घरांमध्ये आवडीने बनवला जातो. भाकरीसोबत खाल्ल्यास या पदार्थाची चव आणखी वाढते. त्याची रेसिपी पाहूयात.
advertisement
2/7
कळणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : कळणा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, बारीक चिरलेली कैरी, लाल मिरची, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे आणि मोहरी.
advertisement
3/7
कृती : सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी टाकून फोडणी द्यावी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यावा.
advertisement
4/7
त्यात लाल मिरची आणि कढीपत्ता घालावा. पुढे लसूण आणि बारीक चिरलेली कैरी टाकून मिश्रण चांगले परतून घ्यावे. मिश्रण लालसर झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून थोडा वेळ परतावे.
advertisement
5/7
त्यानंतर चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजू द्यावेत. दरम्यान पाणी गरम करून ठेवावे. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात कळणा घालून मसाल्यासोबत चांगला मिसळून घ्यावा. त्यानंतर गरम पाणी घालून मिश्रण ढवळावे, जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाहीत.
advertisement
6/7
गरज भासल्यास रवीचा वापर करून मिश्रण नीट एकजीव करावे. कळणा पातळ किंवा घट्ट कसा हवा यानुसार पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करता येते.
advertisement
7/7
नंतर साधारण 10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे. अशा प्रकारे झणझणीत आणि चवदार कळणा तयार होतो. हा पदार्थ भाकरीसोबत विशेष चविष्ट लागतो. जर घरी तुरीची डाळ तयार करत नसाल, तर मिक्सरमध्ये तुरीची डाळ बारीक करूनही कळणा बनवता येतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kalna Recipe : अस्सल विदर्भ स्टाईल, उन्हाळ्यात करा कळणा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल