TRENDING:

'तुला 2 ते 3 कोटी देतो', भाजप नेत्याला ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार समोर, वाशिममधील घटनेमुळे खळबळ

Last Updated:

खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी हरीश सारडा आणि त्याच्या साथीदारांनी हैदराबादला राहणाऱ्या मल्लेश धर्माजी याला खंडणीतून मिळणाऱ्या रकमेतून

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
किशोर गोमासे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

वाशिम : सध्या देशभरात सायबर गुन्हे हे सगळ्यांसमोर मोठं चॅलेंज बनलं आहे. भामटे सर्वसामान्यांना कशा प्रकारे फसवू शकतात, याचा काही नेम नाही. अशातच  वाशिमचे भाजपचे नेते तथा वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख  राजू पाटील राजे यांची सोशल मीडियावर बदनामी करून 25 लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भाजपचे नेते तथा वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून बदनामी कऱण्यात आली होती. या प्रकरणात हरीश सारडा, पंकज इंगोले,आनंद खिरडे,तेजराव इनामदार आणि नारायण वानखेडे अशी ही टोळी राजू पाटील यांच्याविरोधात  सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडिओ टाकून बदनामी करत होते.

advertisement

व्हिडीओ, पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांनी राजू पाटील राजे यांच्यावर दबाव टाकत 25 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेरीस या प्रकरणी राजू पाटील यांनी वाशिम पोलिसाकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार, आरोपी हरीश सारडा सह इतर 4 जणां विरोधात वाशिम शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खोटा व्हिडीओ अन् 2 कोटींची ऑफर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
झोपताना मोबाईल पाहताय? वेळीच सोडा सवय, नाहीतर मेंदूवर होतील हे परिणाम
सर्व पहा

खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी हरीश सारडा आणि त्याच्या साथीदारांनी हैदराबादला राहणाऱ्या मल्लेश धर्माजी याला खंडणीतून मिळणाऱ्या रकमेतून 'तुला दोन ते तीन कोटी रुपये देतो' असे प्रलोभन देऊन त्याला दारू पाजत त्याचा राजू पाटील राजे यांच्या विरोधात बदनामीकारक वाच्यता करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र, त्यानंतर मल्लेश धर्माजी याने वाशिम पोलीस स्टेशनला हजर राहून आपला जबाब नोंदवला असून त्यामध्ये त्याने खंडणीतील पैसे देण्याचे आश्वासन हरीश सारडा याने दिल्याचं कबूल केलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुला 2 ते 3 कोटी देतो', भाजप नेत्याला ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार समोर, वाशिममधील घटनेमुळे खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल