TRENDING:

कोल्हापूरात दोन आमदारांच्या घरी लगीनघाई, हळदीचा पहिला व्हिडीओ समोर

Last Updated:

विवाहसोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही आमदारांच्या निवासस्थानी हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या एका शाही विवाहसोहळ्याची धामधूम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर राजकीय घराणी आता नात्याच्या रेशीमगाठीत अडकणार आहेत. भाजपचे इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आणि माजी आरोग्य राज्यमंत्री तथा अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांचा 15 मार्च रोजी विवाहसोहळा पार पडत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि ताकद अधिक भक्कम होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
News18
News18
advertisement

विवाहसोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही आमदारांच्या निवासस्थानी हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आवाडे आणि यड्रावकर कुटुंबीय पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सानिका आवाडे या नुकत्याच जिल्हा परिषदेवर निवडून आल्या असून, त्या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. दुसरीकडे अजय यड्रावकर हे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात सक्रिय आहेत.

advertisement

लग्नसोहळ्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार? 

कोल्हापूरच्या पूर्व भागात आवाडे आणि यड्रावकर या दोन्ही घराण्यांचे मोठे वर्चस्व आहे. आवाडे घराण्याने पिढ्यानपिढ्या खासदारकी, आमदारकी आणि मंत्रिपदे भूषवली आहेत. आता या दोन ताकदवान घराण्यांच्या एकत्र येण्याने इचलकरंजी आणि शिरोळ पट्ट्यातील राजकीय समीकरणे अधिक मजबूत होणार आहे. या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज मंत्री उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद देणार आहेत.

advertisement

 सतेज पाटलांच्या घरी लगीनघाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
झोपताना मोबाईल पाहताय? वेळीच सोडा सवय, नाहीतर मेंदूवर होतील हे परिणाम
सर्व पहा

केवळ यड्रावकर-आवाडेच नव्हे, तर काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांच्या घरीही लगीनघाई सुरू आहे. त्यांचे सुपुत्र तेजस यांचा विवाह  मार्च रोजी होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूरात दोन आमदारांच्या घरी लगीनघाई, हळदीचा पहिला व्हिडीओ समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल