TRENDING:

सोयाबीन मार्केटमध्ये पुन्हा मोठी उलटफेर! दर वाढणार की कोसळणार? सध्याचे बाजारभाव काय?

Last Updated:

Soybean Market Update : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Soyabean Market
Soyabean Market
advertisement

मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली असली, तरी दरांमध्ये मात्र एकसमानता दिसून आलेली नाही. काही बाजारांत समाधानकारक भाव मिळत असताना, काही ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी दर स्वीकारावे लागत आहेत.

आजचे बाजारभाव काय?

advertisement

८ जानेवारी २०२६ रोजी नागपूर बाजार समितीत लोकल सोयाबीनची सुमारे १००२ क्विंटल आवक झाली. येथे किमान दर ४४०० रुपये, तर कमाल ५१२५ रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आला असून सरासरी दर ४९४३ रुपये राहिला. बुलढाणा बाजारात पिवळ्या सोयाबीनची १५० क्विंटल आवक झाली असून दर ४५०० ते ५००० रुपये दरम्यान स्थिर होते. येवला येथे मात्र आवक अत्यल्प असून केवळ १० क्विंटल सोयाबीनला ४८९९ ते ४९४९ रुपये दर मिळाला.

advertisement

लासलगाव आणि लासलगाव-विंचूर या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली. लासलगावमध्ये ७५४ क्विंटल आवकेसह सरासरी दर ५०११ रुपये राहिला, तर विंचूर येथे ६३५ क्विंटल आवकेसाठी सरासरी ४९५० रुपये दर नोंदवण्यात आला. जळगाव बाजार समितीत सोयाबीनला ५३२८ रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

मराठवाड्यातील माजलगाव, परळी-वैजनाथ, सेलू, रिसोड, तुळजापूर आणि लातूर परिसरातही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली. माजलगावमध्ये तब्बल १३५५ क्विंटल आवक असून सरासरी दर ४९०० रुपये राहिला. परळी-वैजनाथ येथे १११९ क्विंटल आवकेला ४९३० रुपयांचा सरासरी भाव मिळाला. तुळजापूरमध्ये दर ४८५० रुपये स्थिर राहिले.

advertisement

विदर्भात सोयाबीनच्या दरांमध्ये तुलनेने अधिक चढ-उतार दिसून आले. अमरावती बाजारात ५०४६ क्विंटल आवकेसाठी सरासरी दर ४६०० रुपये राहिला. जालना, अकोला, खामगाव आणि वाशीम या बाजारांत मोठ्या प्रमाणावर आवक झाली. विशेषतः खामगावमध्ये तब्बल ९९४९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सरासरी दर ५४२५ रुपये नोंदवण्यात आला. वाशीम बाजारात काही ठिकाणी ६७०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाल्याने हा बाजार लक्षवेधी ठरला.

advertisement

यवतमाळ येथे पिवळ्या सोयाबीनला ५५०० रुपयांचा स्थिर दर मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हिंगणघाटसारख्या काही बाजारांत सरासरी दर ३६०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार आणि बाजारपेठेनुसार दरात मोठी तफावत जाणवत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन मार्केटमध्ये पुन्हा मोठी उलटफेर! दर वाढणार की कोसळणार? सध्याचे बाजारभाव काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल