उत्तम पगार पण समाधान नाही..
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील कोटीनागा मणिकांत आणि नागा वेंकट दुर्गा पवनी असं या दाम्पत्याचे नाव आहे. बीटेक केल्यानंतर मणिकांत इन्फोसिसमध्ये आणि पवनी अॅक्सेंचरमध्ये उत्तम पगाराची नोकरी करत होते. परंतु त्यांच्या मनात समाधान नव्हते.
सेंद्रिय शेतीची कल्पना डोक्यात आली..
आयटी मध्ये काम करत असताना पवनीला त्यांच्या सहकाऱ्यांच्या खाण्या पिण्याच्या अडचणी दिसत होत्या. विविध आजारांना त्यांना सामोरे जावं लागत होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पवनीने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी अनेक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळत नसल्याचंही लक्षात आलं. या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी या सेंद्रिय उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नोकरी करता करता घेतलं प्रशिक्षण
शेतीचा अनुभव नसल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. आठवडाभर नोकरी आणि सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण अशी धावपळ काही महिने सुरू राहिली. नंतर 2017 साली त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी आयटी करिअर सोडले आणि 17 लाखांची गुंतवणूक सेंद्रिय शेतीमध्ये केली.
पहिलं अधिकृत स्टोअर सुरू झालं
सुरुवातीला स्वत:चे स्टोअर नव्हते. सुवातीला मणिकांत स्वतः लोकांच्या घरी सेंद्रिय आंबा, बाजरीचे पीठ, तूर डाळ, हेल्थ मिक्स यांसारखी उत्पादने पोहोचवत होते. काही ग्राहकांची साथ मिळाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसोबत जोडणी सुरू केली. अनेक शेतकरी सुरुवातीला कचरत होते. नंतर हळूहळू विश्वास वाढला आणि 2019 साली गुंटूरमध्ये पहिलं अधिकृत स्टोअर सुरू झालं.
5 वर्षांत 90 लाखांची उलाढाल
पुढे जाऊन त्यांनी मोठ्या यशाला गवसणी घातली. आज त्यांच्याकडे सेंद्रिय तांदुळ, थंड दाबलेली तेलं, विविध पावडर, गुलाबी मीठ, स्नॅक्स, कपकेक आणि खाण्यास तयार पदार्थही उपलब्ध आहेत. फक्त 5 वर्षांमध्ये व्यवसायाने 90 लाख वार्षिक उलाढाल गाठली आहे.तसेच ते सध्या ते 55 शेतकऱ्यांसोबत काम करत असून 10 लोकांना रोजगार देत आहेत.
