अविनाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मागच्या वर्षी देखील त्यांनी काही प्रमाणात अद्रक लागवड केली होती. तेव्हा त्यांनी 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं. मागच्या वर्षी आलेला चांगला अनुभव बघता त्यांनी यावर्षी जास्त क्षेत्रात अद्रक लागवड केली. बाजारभाव चांगला मिळाला तर नक्कीच चांगले उत्पन्न मिळेल.
Maka ali: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, उत्पन्न मिळेल भरघोस
advertisement
अविनाश यांनी एप्रिल-मे महिन्यात शेताची नांगरणी केली होती. त्यानंतर रोटावेटर, शेण खताचा वापर करून मशागत करून घेतली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठिबक सिंचन बेड करून अद्रक पिकाची लागवड केली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यादरम्यान अद्रक काढण्यासाठी तयार होईल.
शेत जमिनीचा दर्जा सामान्य असेल तर चार ते सहा महिने हे पीक शेतात ठेवता येते. जमिनीचा दर्जा एकदम चांगला असेल तर 15 ते 16 महिने देखील हे पीक ठेवता येते. अविनाश यांच्या मते, तरुण असो किंवा अनुभवी सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी अद्रकला 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला होता. गेल्या वर्षी अविनाश यांच्या शेतात 107 क्विंटल अद्रक निघाले होते. मात्र, जास्त भाव नसल्यामुळे त्यातून कमी उत्पन्न मिळाले होते.
अद्रक पिकावर मुख्यतः करपा, टीका, सड किंवा मर हे रोग पडतात. करपा, टीका या रोगांसाठी बुरशीनाशक तसेच कस्टोडिया, कॅब्रोटॉक या औषधांची फवारणी आवश्यक असते. मर रोगासाठी प्रतिबंधक म्हणून सुरुवातीपासूनच ट्रायपोडामाची आवश्यकता असते. अशा पद्धतीने अद्रक पिकाची काळजी घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.





