Maka ali: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, उत्पन्न मिळेल भरघोस
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
तृणधान्याच्या तुलनेत मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते.
सोलापूर: भात आणि गहू नंतर मकाचा मोठ्या प्रमाणात रोजच्या आहारात समावेश होतो. तृणधान्याच्या तुलनेत मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते. मक्यापासून जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यावर होणारा रोगाचा प्रादुर्भाव कसा टाळायचा? त्यावर कोणकोणते रोग पडतात? या संदर्भात अधिक माहिती कृषितज्ज्ञ डॉक्टर पंकज मडावी यांनी दिली.
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी भारतामध्ये सर्वात प्रथम तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आढळून आलेली आहे. तर 2018 मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी या ठिकाणी या किडीची नोंद झाली. ही अमेरिकन लष्करी अळी मका पिकावर जास्त नुकसानकारक आहे. या किडीच्या मादीची प्रजनन क्षमता खूप जास्त असते. एक मादी पतंग एका वेळेस सरासरी 1600 ते 2000 हजार अंडी देऊ शकते.
advertisement
मक्याचे पान पूर्णपणे खाऊन टाकते, पानाचा हिरवा पापुद्रा खाणे, पानांना पांढरे चट्टे पडणे. अंतराने ही अळी कणसाच्या बाजूने आवरणाला छिद्र करून आतील दाणे देखील खाते. या अळीचे व्यवस्थापन करायचे असेल तर पाच टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम मेटारायझियम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी.
advertisement
जर मका पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत. तसेच आपल्या शेतात पक्षी थांबे लावणे, कामगंध सापळे लावणे. जर या कीटकाचे प्रमाण दहा टक्के पेक्षा जास्त दिसून आले तर स्पिनिटोरम, 11.7% एस. सी प्रति दहा लिटर पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. शेतकऱ्यांनी चारा पीक म्हणून मक्याची लागवड केलेली असेल तर त्यांनी रासायनिक खताचा वापर करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ डॉक्टर पंकज मडावी यांनी दिला आहे. अशाप्रकारे मका पिकाची काळजी घेतली तर नक्कीच अधिकाधिक उत्पन्न मिळेल.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 07, 2025 3:24 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Maka ali: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, उत्पन्न मिळेल भरघोस

