Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतात केली पपई लागवड, तरुण शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न

Last Updated:

Farmer Success Story: दोन महिन्यात पपई विक्रीतून तरुण शेतकरी खंडू माडकर यांना साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

+
वडिलांच्या

वडिलांच्या खांद्याला खांदा लावून केली पपईची शेती; खर्च वजा करून दोन महिन्यात घेत

सोलापूर : हरळवाडी गावातील बारावी सायन्सपर्यंत शिक्षण शिकलेल्या तरुणाने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पपईची शेती केली आहे. खंडू माडकर वय 24 असे पपईची शेती केलेल्या तरुणाचे नाव आहे. खंडू यांचे वडील म्हाळप्पा हे आधी पारंपरिक पद्धतीने उसाची शेती करत होते. परंतु मुलाने ऊस न लावता पपई लावण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी देखील होकार दिला. जवळपास दीड एकरात पपईची लागवड केली असून यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. दोन महिन्यात पपई विक्रीतून तरुण शेतकरी खंडू माडकर यांना साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणाऱ्या खंडू म्हाळप्पा माळकर या तरुणाचे शिक्षण बारावी सायन्सपर्यंत झाले आहे. शिक्षण शिकत असताना आईचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या निधनानंतर वडील देखील खचून गेले होते. खंडू याने बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन पुढे शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
वडील पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करत होते. उसाची तोडणी झाल्यावर वर्षाला 70 ते 80 हजार रुपये मिळत होते. मुलाने उसाची लागवड न करता पपईची लागवड करायचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यामध्ये खंडू यांनी दीड एकरमध्ये जवळपास 1500 पपईच्या रोपांची लागवड केली. पपईची संपूर्ण शेती खंडू यांनी ऑरगॅनिक पद्धतीने केली आहे. ताक, गूळ, गोमूत्र आणि शेणखत वापरून पपईची लागवड केली आहे. दीड एकरात पपई लागवडीसाठी सर्व खर्च वजा करून दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर दोन महिन्यात पपई विक्रीतून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
शिक्षण शिकून देखील तरुणांना नोकरी मिळत नाही, नोकरीच्या शोधासाठी घर, गाव आणि शहर सोडावे लागत आहे. उच्चशिक्षित घेतलेल्या तरुणांकडे अर्धा एकर जरी शेती असली तरी त्यामध्ये नवनवीन प्रयोग करून योग्य पद्धतीने जर पीक घेतली तर नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न या शेतीतून मिळेल असा सल्ला बारावी सायन्सपर्यंत शिक्षण शिकलेले तरुण खंडू माडकर यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतात केली पपई लागवड, तरुण शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement