TRENDING:

शेतकऱ्यांच्या दुबार अनुदानाबाबत कृषी विभागाचा कठोर निर्णय!

Last Updated:

Agriculture News : राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, एखाद्या शेतकऱ्याने मागील पाच वर्षांच्या कालावधीत ज्या घटकासाठी अनुदानाचा लाभ घेतला आहे, त्याच घटकासाठी पुन्हा अनुदान देण्यात येणार नाही. दुबार लाभ टाळण्यासाठी आणि अनुदान वाटपात शिस्त राखण्यासाठी हे नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
agriculture news
agriculture news
advertisement

निर्णय काय आहे?

या संदर्भात माहिती देताना विभागीय कृषी सहसंचालकांनी स्पष्ट केले की, कृषी आयुक्तालयाकडून यापूर्वीच दुहेरी लाभ रोखण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही जिल्ह्यांत एकाच लाभार्थ्याला त्याच घटकासाठी पुन्हा अनुदान मंजूर होण्याची शक्यता निर्माण होत होती. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवरील संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने अधिक स्पष्ट आणि कडक आदेश जारी केले आहेत.

advertisement

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कृषी यांत्रिकीकरण योजनेतून एका लाभार्थ्याची निवड केवळ एका विशिष्ट घटकासाठीच करण्यात आली असल्यास, त्या घटकासाठी मागील पाच वर्षांत लाभ घेतलेला आढळल्यास अनुदानाचा प्रस्ताव थेट नाकारण्यात येईल. यामुळे अनुदान वितरणातील अनियमितता टळण्यास मदत होणार आहे.

तसेच, योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अपलोड केलेल्या कोटेशनप्रमाणेच यंत्र किंवा अवजार खरेदी करणे बंधनकारक राहील, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. कोटेशनमध्ये बदल करून वेगळे यंत्र खरेदी केल्यास अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

advertisement

ट्रॅक्टर अनुदानाबाबत स्पष्टता

ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकरी, अल्प व मध्यम भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हे अनुदान एक लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहील. तसेच, सेवा सुविधा केंद्रांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अपवादात्मक बदलांना परवानगी

advertisement

काही अपवादात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांना निवड झालेल्या घटकाऐवजी दुसरे यंत्र किंवा अवजार खरेदी करण्याची मुभा देण्यात येऊ शकते. मात्र, यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असेल. या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता लक्षात घेता, आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांऐवजी तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही घटक बदलाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी कडक तपासणी

advertisement

राज्यात ट्रॅक्टर अनुदानासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असून, काही जिल्ह्यांत एकाच वेळी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे. अशा परिस्थितीत, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी पूर्वसंमती देताना संबंधित शेतकऱ्याकडे प्रत्यक्षात ट्रॅक्टर उपलब्ध आहे की नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हमीपत्र घेण्याचे आदेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

जर ट्रॅक्टर अद्याप खरेदी करण्यात आलेला नसेल, तर संबंधित शेतकऱ्याकडून “माझी ट्रॅक्टरसाठी निवड झाली असून मी लवकरच ट्रॅक्टर खरेदी करणार आहे,” असे लेखी हमीपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ट्रॅक्टरची खरेदी झाल्यानंतर मोका तपासणीवेळी त्याचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तपासूनच अनुदान अदा करण्यात येईल, असेही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्टपणे कळवण्यात आले आहे.

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांच्या दुबार अनुदानाबाबत कृषी विभागाचा कठोर निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल