advertisement

APMC Market Rate: हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?

Last Updated:

सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये शेवगा, डाळिंब आणि आल्याची आवक व भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market 

मुंबई: सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये शेवगा, डाळिंब आणि आल्याची आवक व भाव पाहू.
आल्याची आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1971 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 830 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3947 ते 7347 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 24 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 5000 ते 6000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 106 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 48 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 14000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 15000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाच्या आवकेत सुधारणा: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1300 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 1061 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 5000 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल डाळिंबास 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement