शेतीमध्ये वाढता खर्च आणि मिळत असलेले कमी उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खर्च आणि हिशोबाचे गणित न बसल्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळेच वैविध्यपूर्ण पीक पद्धती आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे.
advertisement
5 फुटाच्या बेडवर शेती
सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक अंतर्गत शेतीमध्ये सुरुवातीला पाहिजे तेवढी आंतरमशागत केली जाते. त्यामध्ये नांगरणी, वखरणी, रोटर इत्यादी सर्व साधनांचा वापर केला जातो. त्यानंतर चार किंवा पाच फुटावर बेड पाडले जातात. बेडवर ठिबक सिंचनाची सुविधा शेतकरी करू शकतात. बेडवर वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतलं जातं. पिकाची कापणी केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत केली जात नाही.
दोनच यंत्रांचा वापर
कापणी केल्यानंतर पिकाची बूट तसेच शेतात ठेवून पावसाळ्यात पुन्हा एकदा त्याच बेडवर नवीन पिकाची लागवड केली जाते. शेतातील तणाचे नियंत्रण हे तणनाशक फवारणीच्या माध्यमातून केले जाते. टोकण यंत्राच्या साह्याने पेरणी आणि फवारणी यंत्राच्या साह्याने तणनाशक फवारणी ही दोनच यंत्रे शेती करताना वापरली जातात. यामुळे शेतीमध्ये मजुरांची टंचाई भासत नाही, असे शेतकरी गिराम सांगतात.
शेतकऱ्यांना आवाहन
एसआरटी पद्धतीमुळे शेतीवर होत असलेला अनियंत्रित खर्च नियंत्रणात येतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते. ही शेती पद्धत ही आनंददायी शेती पद्धत आहे. ज्या पद्धतीने आपल्या शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिन असते, त्याच पद्धतीने जमिनीसाठी कार्बन काम करतं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यास उत्पादनात वाढ होऊन पिकांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक पद्धतीचा अवलंब अवश्य करावा, असं आवाहन विष्णुपंत गिराम यांनी शेतकऱ्यांना केले आहे.