रंजना आणि अशोक डोईफोडे हे पैठण तालुक्यातील पाचोरा गावचे शेतकरी दाम्पत्य आहे. त्यांनी आपल्या एक एकर शेतात जांभळाची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सहा वर्षांपूर्वी 100 झाडांची लागवड केली. तीन वर्षांत जांभळाचे फळ विक्रीसाठी उपलब्ध झाले. जांभळाला बाजारात चांगला भाव असून अत्यंत कमी खर्चात त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, शेवगा शेतीत पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, लाखोंचा फायदा
advertisement
सध्या डोईफोडे यांच्या शेतातील एका जांभळीच्या झाडाला तब्बल एक क्विंटल पेक्षा अधिक जांभळे लागले आहेत. आज या जांभळाला 180 ते 200 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. या पिकाच्या माध्यमातून चार लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात पारंपरिक पिकांसोबतच वेगळा पर्याय शोधला पाहिजे. जांभूळ शेती फायद्याची असून कमी खर्चात चांगली कमाई होते, असे अशोक डोईफोडे सांगतात.





