Farmer Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, शेवगा शेतीत पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, लाखोंचा फायदा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेवग्याच्या शेंगा ऐवजी पानांपासूनच लाखात कमाई होतेय. माढा तालुक्यातील चिंचोलीचे हणमतूं लोंढे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या फायद्याच्या शेतीबाबत लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
advertisement
advertisement
माढा तालुक्यातील चिंचोलीचे शेतकरी हणमंतू लोंढे हे गेल्या 15 वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. पारंपारिक शेती करताना म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे लोंढे यांनी थोडासा अभ्यास करून शेवगा लागवड करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ही शेती फक्त शेंगांपुरतीच मर्यादित न ठेवता शेवग्याच्या पानांची पावडर देखील करून विकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
हनुमंत लोंढे यांनी शिवांजली फॉर्म ॲन्ड हर्बल या नावाने फर्म नोंदणी केली आहे. शेवग्याच्या पाल्यापासून बनवलेला पावडर गुडघेदुखी, कंबर दुखी, शुगर कमी करणे, ब्लड प्रेशर नियंत्रण करणे, थायरॉईड, सांधेदुखी सह 300 आजारावर शेवगा पावडर औषधी म्हणून गुणकारी आहे. हनुमंत लोंढे यांच्याकडे फायटर मोरिंगा पावडर 50 ग्रॅम पासून ते 1 किलो पर्यंत मिळत मिळत आहे.
advertisement