TRENDING:

Agriculture News : नाद नाय करायचा! अहिल्यानगरचा शेतकरी एलईडी बल्बच्या उजेडात करतोय शेती, नेमकं कारण काय?

Last Updated:

Ahilyanagar News : शेतीत नवनवीन प्रयोग करत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे यांनी केलेला यशस्वी प्रयोग. त्यांनी उन्हाळी शेवंती पीक वाढीसाठी 200 एलईडी बल्ब बसवून प्रकाश पुरवला आणि त्यातून शानदार उत्पादन मिळवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर -  शेतीत नवनवीन प्रयोग करत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे यांनी केलेला यशस्वी प्रयोग. त्यांनी उन्हाळी शेवंती पीक वाढीसाठी 200 एलईडी बल्ब बसवून प्रकाश पुरवला आणि त्यातून चांगले उत्पादन मिळवले आहे.
News18
News18
advertisement

शेवंती लागवडीसाठी एलईडी बल्बचा अनोखा प्रयोग

हिवाळ्यात दिवस छोटे आणि रात्री लांब असतात,त्यामुळे शेवंतीच्या वाढीसाठी पुरेसा प्रकाश मिळत नाही. त्यामुळे दारकुंडे यांनी रात्रीच्या वेळी 200 एलईडी बल्बच्या सहाय्याने रोपांना आवश्यक प्रकाशपुरवठा केला. हा प्रयोग जिल्ह्यातील पहिल्या प्रयत्नांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

शेवंती ही उन्हाळ्यातील पीक मानली जाते आणि साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते. मात्र, थंडीत वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते. या समस्येवर उपाय म्हणून शेवंतीच्या झपाट्याने वाढीसाठी कृत्रिम प्रकाश पुरवण्याची कल्पना अमलात आणली.

advertisement

अशाप्रकारे झाला प्रयोगाचा यशस्वी अंमल

दारकुंडे यांनी गुलाब शेतीसोबत आंतरपीक म्हणून "बिजली" नावाच्या पांढऱ्या शेवंतीची लागवड नोव्हेंबरमध्ये केली. रोपांना आवश्यक प्रकाश मिळावा यासाठी २०० एलईडी बल्ब बसवले आणि केबलच्या साहाय्याने संपूर्ण अर्धा एकर शेत प्रकाशमान ठेवले.

प्रयोगासाठी सुमारे 40, 000 रु खर्च

एलईडी बल्बमुळे रोपांची झपाट्याने वाढ झाली आणि हंगामाच्या बाहेरही उत्पादन मिळण्याची संधी निर्माण झाली.मार्च-एप्रिलमध्ये बाजारात पांढऱ्या शेवंतीची मागणी असते, मात्र उपलब्धता कमी असते. यामुळे उच्च दर मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

7 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित

दारकुंडे यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात शेवंती फुलायला सुरुवात होईल. बाजारात या काळात पांढऱ्या शेवंतीच्या फुलांची मोठी मागणी असते, त्यामुळे चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग पाहून इतर शेतकरीही त्यांच्या शेताला भेट देत आहेत आणि प्रयोगाबद्दल माहिती घेत आहेत. रात्रीच्या अंधारात झगमगणारे बल्ब दूरूनही स्पष्ट दिसतात, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हा प्रयोग चर्चेचा विषय बनला आहे. दारकुंडे यांचा हा अनोखा प्रयोग शेतीतील एक नवा दिशादर्शक ठरू शकतो आणि इतर शेतकऱ्यांनाही अशा नवकल्पनांचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळू शकते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : नाद नाय करायचा! अहिल्यानगरचा शेतकरी एलईडी बल्बच्या उजेडात करतोय शेती, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल