छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे बाळासाहेब काकडे यांनी 2023 मध्ये गाय पालनाचा व्यवसाय सुरू केला. आधीपासूनच गाईंची आवड असल्यामुळे गाय पालनावर विचार केला, इतर व्यवसायांमध्ये नियोजन लागत नव्हते तसेच शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे गाय पालनाचा निर्धार केला. सुरुवातीला 5 गाई आणल्या. सहा महिन्यांमध्ये गाय पालन नियोजन आमचे पक्के झाले. त्यानंतर आणखी काही गाईंची त्यामध्ये वाढ केली आणि सध्याच्या परिस्थितीत 23 गाई असल्याचे काकडे सांगतात.
advertisement
नोकरी सोडली अन् कलेलाच फोकस केलं, 22 वर्षांच्या प्रणालीची लाखात कमाई, करते काय?
गाईंचे संगोपन आणि पालन आणि शेण काढणे, गाईंना चारा-पाणी करणे, दूध काढणे आणि गोठ्याची स्वच्छता करणे हे सर्व कामे काकडे स्वतः करतात त्यामुळे त्यांना अधिक नफा मिळतो. गायपालन करत असताना गाईंच्या आरोग्याची काळजी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तसेच गाईंना खाण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच नवीन तरुणांनी गाय पालनाच्या व्यवसायात इतरांचे व्हिडिओ किंवा नफा पाहून येऊ नये, स्वतःची कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की गाय पालनामध्ये आपले पाऊल ठेवणे महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे.





