TRENDING:

शेतकरी असावा तर असा! 20 गुंठ्यात सुरु केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 7 लाखांचा नफा

Last Updated:

सध्याच्या घडीला शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. बीड जिल्ह्यातील दत्ता सोनवणे यांनी पारंपारिक शेतीच्या पलीकडे विचार करत नर्सरी व्यवसाय सुरू केला आणि आर्थिक स्थिरतेकडे यशस्वी वाटचाल केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी 
advertisement

 बीड : सध्याच्या घडीला शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. बीड जिल्ह्यातील दत्ता सोनवणे यांनी पारंपारिक शेतीच्या पलीकडे विचार करत नर्सरी व्यवसाय सुरू केला आणि आर्थिक स्थिरतेकडे यशस्वी वाटचाल केली आहे. अडीच एकर शेती असलेल्या दत्ता सोनवणे यांनी पारंपारिक शेतीसोबत जोडधंदा करण्याचा विचार केला आणि 20 गुंठे जमिनीत नर्सरीची सुरुवात केली. मागील चार वर्षांत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने हा व्यवसाय फुलवला आहे.

advertisement

शेती हा निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी आणि जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी दत्ता सोनवणे यांनी नर्सरी व्यवसायाची निवड केली. सुरुवातीला त्यांनी पालेभाज्या, फुलझाडे आणि फळझाडांच्या रोपांवर भर दिला. योग्य खतांचे प्रमाण, पाणी व्यवस्थापन आणि चांगल्या प्रतीची रोपे उपलब्ध करून देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची नर्सरी शेतकरी आणि बागकामप्रेमींसाठी एक विश्वासार्ह केंद्र बनली आहे.

advertisement

शेतीला जोडधंदा म्हणून देशी कोंबड्यांचे पालन, 30 दिवसांत 2 लाख कमाई, वाचा शेतकऱ्याची कहाणी

सुरुवातीच्या काळात दत्ता सोनवणे यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. योग्य बाजारपेठ मिळवणे, रोपांची गुणवत्ता राखणे आणि आर्थिक गुंतवणूक व्यवस्थापन ही मोठी आव्हाने होती. मात्र त्यांनी सातत्याने प्रयत्न करत या सर्व अडथळ्यांवर मात केली. त्यांच्या नर्सरीत आता कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, वांगी यांसारख्या पालेभाज्यांच्या रोपांसह औषधी वनस्पती आणि शोभेच्या झाडांचीही मागणी वाढली आहे.

advertisement

या व्यवसायामुळे दत्ता सोनवणे यांचे उत्पन्न वाढले असून त्यांनी आपल्या नर्सरीत स्थानिक युवकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात हे त्यांनी आपल्या यशाने सिद्ध केले आहे. भविष्यात त्यांचा नर्सरीचा विस्तार करण्याचा मानस आहे आणि ते ऑनलाइन विक्रीचाही विचार करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

दत्ता सोनवणे यांची यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मेहनत, ध्येयधोरण आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर कुठलाही शेतकरी यशस्वी उद्योजक बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. दत्ता सोनवणे हे शेतकरी नर्सरी या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला कमीत कमी 7 लाखांपर्यंत नफा मिळवतात. कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला असून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतकरी असावा तर असा! 20 गुंठ्यात सुरु केला नर्सरी व्यवसाय, वर्षाला 7 लाखांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल