TRENDING:

खतरनाक! 2 भावांनी नोकरी सोडली अन् घेतला धाडसी निर्णय, आता या शेतीतून दिवसाला करताय 2,00, 000 ची कमाई

Last Updated:

Success Story :शहरात नोकरी करणाऱ्या अनेक तरुणांच्या मनात कधीतरी गावाकडे परतून शेती करण्याचा विचार येतो. मात्र बहुतांश लोकांसाठी हे फक्त स्वप्नच राहते. काही जण मात्र धाडसाने निर्णय घेतात आणि स्वप्न पूर्ण करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Success Story
Success Story
advertisement

मुंबई : शहरात नोकरी करणाऱ्या अनेक तरुणांच्या मनात कधीतरी गावाकडे परतून शेती करण्याचा विचार येतो. मात्र बहुतांश लोकांसाठी हे फक्त स्वप्नच राहते. काही जण मात्र धाडसाने निर्णय घेतात आणि पारंपरिक विचारांना छेद देत शेतीतूनच यशस्वी उद्योजक बनतात. आग्र्यातील दोन भावांनी असेच धाडस करत मशरूम शेतीतून दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.

advertisement

आग्रा जिल्ह्यातील ऋषभ गुप्ता आणि आयुष गुप्ता या भावांनी अत्याधुनिक मशरूम लागवडीचा प्रयोग सुरू केला. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण किंवा पूर्वानुभव नसताना त्यांनी हळूहळू हा व्यवसाय उभा केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरुवात करून आज ते दररोज सुमारे 1,600 किलो उच्च दर्जाचे मशरूम उत्पादन घेत आहेत. त्यांच्या मशरूमला केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे.

advertisement

दुबईतील नोकरी सोडली

2019 मध्ये कोविड काळात ऋषभ दुबईतील नोकरी सोडून भारतात परतला. त्याच काळात त्याचा धाकटा भाऊ आयुष याने लंडन विद्यापीठातून बीबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. दोघांनी एकत्रितपणे व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी काकडीसारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली. मात्र काही महिन्यांतच मशरूम शेतीत जास्त नफा आणि स्थिर बाजारपेठ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

advertisement

2022 मध्ये घेतला मोठा निर्णय

2022 मध्ये त्यांनी मोठा निर्णय घेत त्यांच्या जमिनीवर 12 आधुनिक वातानुकूलित शीतगृहे उभारली. या चेंबरमध्ये सुमारे 13 अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवले जाते, जे मशरूम लागवडीसाठी आदर्श मानले जाते. प्रत्येक चेंबरमध्ये हजारो बेड तयार करून रॅक पद्धतीने लागवड केली जाते. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनात सातत्य राखण्यात त्यांना यश आले.

advertisement

मशरूमच्या गुणवत्तेसाठी दोन्ही भावांनी कंपोस्ट स्वतः तयार करण्यावर भर दिला. गव्हाचा व तांदळाचा पेंढा, कोंबडी खत आणि जिप्सम यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून कंपोस्ट तयार करण्यात येते. संपूर्ण प्रक्रियेला साधारण एक महिना लागतो. नियंत्रित वातावरणामुळे मशरूमचा आकार, रंग आणि चव उत्तम राहते, ज्यामुळे बाजारात त्यांना प्रीमियम दर मिळतो.

वर्षाला 7 कोटींचा नफा

विक्रीसाठी सुरुवातीला त्यांनी स्थानिक बाजारपेठ गाठली. हळूहळू थेट कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधत मध्यस्थ टाळले. त्यामुळे ग्राहकांना ताजे मशरूम मिळू लागले आणि उत्पादकांना योग्य दर मिळू लागला. आज त्यांची रोजची उलाढाल सुमारे 2 लाख रुपयांहून अधिक आहे, तर वार्षिक नफा अंदाजे 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

भविष्यात मशरूम कॅनिंग, पॅक्ड उत्पादने आणि स्वतःचा स्पॉन तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमामुळे आग्रा हे आधुनिक मशरूम शेतीचे केंद्र म्हणून देशभरात ओळखले जाईल, असा विश्वास दोन्ही भावांनी व्यक्त केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
खतरनाक! 2 भावांनी नोकरी सोडली अन् घेतला धाडसी निर्णय, आता या शेतीतून दिवसाला करताय 2,00, 000 ची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल