पीक विमा योनजेतील बदल
- एक रुपयात विमा योजना बंद:
2023 पासून राबवली जाणारी ‘एक रुपयात पीक विमा योजना’ बंद करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी पिकांसाठी 1.5%, आणि नगदी पिकांसाठी 5% प्रीमियम भरावा लागेल.
- तीन ट्रिगर रद्द:
यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, आणि काढणी पश्चात नुकसान या तीन ट्रिगरच्या आधारे नुकसानभरपाई दिली जात होती. आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसानभरपाई मिळेल.
advertisement
- ई-पीक पाहणी अनिवार्य:
विमा अर्जासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणीकृत पिकांवरच विमा लागू होईल. यामुळे चुकीच्या पिकांच्या नोंदी टाळल्या जातील. त्याचबरोबर पूर्वी अनेक कंपन्यांचा समावेश या योजनेत होता परंतू आता ही जबाबदारी केवळ दोनच कंपन्यांना देण्यात आली आहे.
- फार्मर आयडी आवश्यक:
पीक विमा योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. यामुळे ॲग्रिस्टॅक योजनेशी संलग्नता वाढेल आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल.
- काळ्या यादीची तरतूद:
बोगस किंवा फसवणूक करून विमा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल. यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
या बदलांमुळे शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. विमा अर्जासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उताऱ्यावरील नाव समान असणे गरजेचे आहे.