TRENDING:

दिवाळीनंतर 'ड्रॅगन फ्रूट' पिकाची लागवड करा, अन् २० वर्ष लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवा

Last Updated:

Dragon Fruit Farming :  निवडुंग कुळातील अत्यंत महत्त्वाचे आणि आकर्षक फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रूट आज भारतीय शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Agriculture News
Agriculture News
advertisement

मुंबई : निवडुंग कुळातील अत्यंत महत्त्वाचे आणि आकर्षक फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रूट आज भारतीय शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. सुरुवातीला केवळ शोभेच्या झाडांप्रमाणे लागवड केली जाणारी ही वनस्पती आता व्यापारी दृष्टिकोनातून एक फायदेशीर फळपीक म्हणून उदयास आली आहे. आपल्या रंग, चव आणि औषधी गुणधर्मांमुळे हे फळसुपर फ्रूट’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

advertisement

ड्रॅगन फ्रूटलानोबल वूमन’ आणि ‘रातराणी’ अशी नावेही दिली गेली आहेत. याचे प्रकार साल आणि गर यांच्या रंगावरून ओळखले जातात. पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल, तसेच पांढरा गर व पिवळी साल हे प्रमुख प्रकार आहेत. भारतात प्रामुख्याने पांढरा गर व लाल साल असणाऱ्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर उर्वरित प्रकारांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो आहे.

advertisement

या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्व क आणि ब, फ्लावोनॉइड्स, तसेच तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे फळ रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हे फळ लाभदायक ठरते. तसेच, फॉस्फोरस आणि कॅल्शियमसारखी खनिजे असल्याने हे हाडे व दात मजबूत करण्यास सहाय्यक आहे. याशिवाय, हे फळ वजन कमी करणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि दृष्टी सुधारण्यास देखील उपयुक्त आहे.

advertisement

लॅटिन अमेरिकेत या वनस्पतीच्या पाने आणि फुलांचा वापर हायपोग्लायसेमिक आणि मूत्रवर्धक औषधांमध्ये केला जातो. याच्या फळांपासून जाम, जेली, ज्यूस, सिरप, कँडी आणि वाइन तयार केली जाते. फळाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात पेक्टिन असल्यामुळे त्याचा वापर जेलिंग एजंट म्हणून केला जातो, तसेच सालीपासून नैसर्गिक खाद्य रंगही तयार केला जातो.

advertisement

ड्रॅगन फ्रूटची उत्पत्ती मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे झाली असून, त्यानंतर हे फळ ऑस्ट्रेलिया, चीन, व्हिएतनाम, थायलंड, इस्रायल, स्पेन, श्रीलंका आदी देशांमध्ये पसरले. भारतात वाढत्या मागणीमुळे याची शेती झपाट्याने वाढत आहे. सध्या हे पीक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि काही पूर्वोत्तर राज्यांमध्ये घेतले जाते.

जमिनीची निवड व हवामान

या पिकाची लागवड काळी, मुरमाड आणि कमी खोलीच्या जमिनीत करता येते. मात्र, पाण्याचा निचरा चांगला असणे आवश्यक आहे, कारण जास्त पाणी साचल्यास खोड सडण्याचा धोका असतो. मातीचा pH ५.५ ते ६.५ दरम्यान असणे योग्य ठरते. हे पीक समुद्रसपाटीपासून १७०० मीटर उंचीपर्यंत घेतले जाऊ शकते. २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीसाठी सर्वाधिक योग्य आहे. अती उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे सनबर्न व रोग वाढतात, त्यामुळे बागेमध्ये २०३०% सावली ठेवणे फायदेशीर ठरते.

लागवडीची वेळ आणि पद्धत

मान्सूनपूर्व काळ ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मात्र, पाण्याची सुविधा असल्यास वर्षभर लागवड शक्य आहे. हे एक वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे लागवडीपूर्वी मजबूत आधार प्रणाली उभारणे आवश्यक असते. यासाठी आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य मानले जाते, कारण या झाडांचे आयुष्य साधारण २० वर्षांपेक्षा अधिक असते.

भारतीय बाजारपेठेत या फळाला मिळणारा उच्च दर, दीर्घकालीन उत्पादनक्षमता आणि निर्यातीची संधी पाहता ड्रॅगन फ्रूट हे आगामी काळात भारतीय फळ शेतीचे आकर्षण बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर वाढ आजही नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
दिवाळीनंतर 'ड्रॅगन फ्रूट' पिकाची लागवड करा, अन् २० वर्ष लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल