TRENDING:

हे पीक आहे कुबेरांचा खजिना, एकदा लागवड करून 25 वर्षं होतो नफा

Last Updated:

Dragon Fruit Farming: शेतकरी राजेश कुमार यांनी 5 एकरात ड्रॅगन फळांची लागवड केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आशीष त्यागी
News18
News18
advertisement

बागपत: उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी राजेश कुमार 2 वर्षांपासून ड्रॅगन फळांची लागवड करत आहेत. शेतकऱ्याच्या मते ड्रॅगन फ्रूट्सच्या लागवडीतून पारंपरिक पिकांच्या तुलनेत तिप्पट नफा मिळतो. हे पीक कमी खर्चात तयार करता येते. तसेच, एकदा लागवड केल्यावर पुढच्या 25 वर्षांसाठी नफा मिळवता येतो. या फळाला बाजारात इतकी मागणी आहे की, ते शेतातून काढल्यानंतर लगेचच त्याची विक्री केली जाते.

advertisement

ड्रॅगन फ्रूटकडे कसे वळले शेतकरी?

शेतकरी राजेश कुमार यांनी सांगितले की, पूर्वी तो भात, गहू, ऊस आणि इतर पिके घेत असे. कमी उत्पन्नामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याचवेळी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी शिवम सिंह यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी ड्रॅगन फळांची लागवड सुरू केली आणि हरियाणातील कर्नाल येथून ड्रॅगन फळांच्या बिया आणल्या.

advertisement

18 महिन्यांत फळे 

शेतकऱ्याने सांगितले की, त्याने आपल्या शेतात बियाणे पेरले. जिथे 18 महिन्यांत रोप तयार झाल्यानंतर त्याला फळे येऊ लागली. त्यानंतर शेतकऱ्याला चांगला नफा मिळत आहे. आज बाजारात ड्रॅगन फ्रूटचे दर 150 ते 250 रुपये प्रतिकिलो असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

advertisement

झाडे 25 वर्षे फळ देतात

शेतकरी राजेश यांनी सांगितले की, ते खेकरा शहरातील त्यांच्या 8 बिघा म्हणजे साधारण 5 एकर जमिनीवर शेती करत आहेत. हे एक असे पीक आहे ज्याला कमी पाणी लागते आणि त्याच्या झाडाला कीड देखील सहसा इजा करत नाहीत. त्याच्या देखभालीची योग्य काळजी घेतल्यास, एकदा लागवड केल्यास ते 25 वर्षे सतत फळ देते.

advertisement

शेतातूनच विक्री केली जाते

या ऑफ सीझनमध्ये ड्रॅगन फ्रूटचा दर सुमारे 400 किलोपर्यंत वाढतो, असे शेतकऱ्याने सांगितले. हे असे पीक आहे, ते उगवल्यानंतर शेतकऱ्याला इतर पिकांच्या तिप्पट नफा मिळतो आणि मागणी एवढी असते की, फळं शेतातूनच विकली जाताात.

मराठी बातम्या/कृषी/
हे पीक आहे कुबेरांचा खजिना, एकदा लागवड करून 25 वर्षं होतो नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल