advertisement

नोकरी गेली अन् व्यवसायाची आयडिया सुचली, घरातून सुरू केला मसाले ब्रँड, महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:

लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरी होती जाण्याच्या मार्गावरती त्यामुळे सुरू केला स्वतःचा मसाला व्यवसाय‎‎

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : कोरोनामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेक जण व्यवसायाकडे वळले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील संतोष कानगुलकर यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये एक मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी शेफ मसाले नावाने व्यवसाय सुरू केला आहे. घरामधून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ॲमेझॉन वरती देखील त्यांचे मसाले ऑनलाईन तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला लाखोंची कमाई करतात.
संतोष कानगुलकर हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील पण नोकरीनिमित्त ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी एका हॉटेलवरती भांडे घासण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉटेल वरती काम करत करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा पूर्ण केला आणि एका खाजगी हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला लागले. त्या ठिकाणी ते नोकरी करत होते पण त्यानंतर लॉकडाऊन आलं, म्हणजे कोरोनाचा काळ आला. कोरोना आल्यामुळे सर्वांच्याच नोकरीला धोका आला होता. त्यामुळे ते ज्या ठिकाणी काम करायचे, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करा जोपर्यंत हा काळ जात नाही तोपर्यंत. म्हणून त्यांनी मसाल्याचा व्यवसाय करायचा ठरवलं.
advertisement
त्यांची आई आधीपासूनच घरगुती मसाले करायची. त्यामुळे त्यांना वाटलं की आपण मसाल्याचा व्यवसाय करूया. सुरुवातीला त्यांनी एकदम कमी भांडवलामध्ये मसाला व्यवसायाची सुरुवात केली. शेफ मसाले नावाने त्यांनी त्यांचा मसाल्यांचा ब्रँड सुरू केला. त्यानंतर जशी मागणी आली तसे तसे लोकांना मसाले आवडायला लागले, त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढवला.
advertisement
आज त्यांच्याकडे 20 ते 25 प्रकारचे मसाले मिळतात. त्यामध्ये तुम्हाला रेडी टू कुक मसाला देखील मिळतो. विशेष म्हणजे हे जे सर्व मसाले आहेत ते जात्यावरती बनवले जातात. कुठल्याही मशीनचा किंवा गिरणीचा वापर ते अजिबात करत नाहीत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह  हे वापरले जात नाही. त्यांच्या मसाल्याला संपूर्ण ठिकाणाहून मोठी मागणी असते. त्यासोबतच ॲमेझॉन वरती देखील त्यांचे मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
हा व्यवसाय करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. कधी पैशाची अडचण आली किंवा कधी इतरही अडचणी आल्या, पण तरी त्यांनी त्यांच्या या व्यवसायामध्ये सातत्य ठेवले. आज महिन्याला 1 लाखांची कमाई त्यांची होते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
नोकरी गेली अन् व्यवसायाची आयडिया सुचली, घरातून सुरू केला मसाले ब्रँड, महिन्याला 1 लाख कमाई
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement