आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांचं कांदा हा खराब होत चाललेला आहे आणि तोच कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्याने कांद्याला म्हणावे तसे दर मिळत नाही. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला 900 रुपये ते 1400 रुपये दर मिळत आहे.
advertisement
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ही अपेक्षा निराशामध्ये बदली आहे. तसेच बाहेरच्या देशात कांद्याची मागणी सुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळे भारत देशातून कांद्याचा एक्सपोर्ट सुद्धा कमी झालेला आहे. पहिला महाराष्ट्रच कांद्याचे उत्पादन घेत होता. पण आता मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच गुजरात मध्ये सुद्धा कांदा उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या कांद्याची आवक सर्वत्र वाढलेले आहे त्यामुळे कांद्याला मागणी कमी झाली असल्याची माहिती कांदा व्यापारी सिद्धाराम बावकर यांनी दिली.
गेल्या काही दहा ते बारा दिवसांपासून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत चाललेले आहे. कांद्याची आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव पडत आहे. तर दुसरीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने काळया मातीत राबणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या अगोदर कांद्याला योग्य दर मिळाले तर ठीक नाहीतर शेतकऱ्याचा कांदा लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.