Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला खास सजावट, 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 11 हजार आंब्यांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीया हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 11 हजार आंब्यांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. गणपतीभोवती आंब्यांची विशेष आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची रंगीबेरंगी सजावट यामुळे मंदिर परिसर भक्तिभावाने नटलेला दिसत आहे.
हा महानैवेद्य पुण्यातील प्रसिद्ध आंबेवाले देसाई बंधू यांच्या मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी करून गणरायाचे दर्शन घेतले. अक्षयतृतीया निमित्ताने स्वराभिषेकाच्या माध्यमातून श्रीगणेशाच्या चरणी भक्तांनी सेवा अर्पण केली.
advertisement
अक्षय तृतीया निम्मित दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणपती बाप्पाचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला, तर रात्री भारतीय महिलांच्या वतीने भजन सादर करण्यात येणार आहे. हे बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली आहे.
गणपती बाप्पाला अर्पण केलेला हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग निवास अशा ठिकाणी हा नैवेद्य वितरित केला जाणार असल्याची माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 30, 2025 1:45 PM IST
मराठी बातम्या/Temples/
Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला खास सजावट, 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण, Video





