शेतीमध्ये काहीतरी वेगळा आणि नवीन प्रयोग करायचा या उद्देशाने पाथ्री येथे एक एकर क्षेत्रात तोडले आणि कंटुले लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन्ही पिके एकत्र कुठेच पाहायला मिळत नाही. कंटुलेची लागवड बऱ्याच ठिकाणी सध्या झालेली आहे. मात्र नंतर तोडल्याची लागवड करण्याचे ठरवले.
advertisement
मांजरवाडी जवळील मंचर या ठिकाणाहून 35 रुपयांना एक रोप आणले आणि शेतामध्ये मंडपासारखा या रूपांना आकार देण्यात आला. तोडले हे झाड जवळपास 15 ते 16 वर्ष उत्पादन देते आणि तोडले शेतीत येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गरजेप्रमाणे रोपं तयार करणार आहे. तसेच येणाऱ्या काळात कंटुले शेती देखील करणार असल्याचे पाथ्रीकर यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बाजारामध्ये तोडले 60 ते 70 रुपये किलो दराने विकल्या गेले. सध्या 40 ते 50 रुपये भाव तोडल्यांना सुरू आहे. या पिकातून नुकसान कमी होते आणि उत्पन्न समाधानकारक मिळते. मात्र यामध्ये सातत्य आणि नियोजन पद्धतीने मेहनत करणे गरजेचे आहे. तोडले शेतीचा नवीन प्रयोग असल्यामुळे या पिकावर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणत्या औषधांची फवारणी करावी, कशा पद्धतीने काळजी घ्यावी याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.





